Vidarbh24News

Latest Online Breaking News

*ध्येय प्राप्तीसाठी परीश्रमाची तयारी ठेवा – अनुज तारे*

*ध्येय प्राप्तीसाठी परीश्रमाची तयारी ठेवा – अनुज तारे*
डोळयासमोर ठेवलेले ध्येय प्राप्तीसाठी सकारात्मक दृष्टीकोन व परिश्रम करण्याची तयारी ठेवल्यास अपेक्षीत ध्येय सहज गाठता येते. असा विश्वास सहायक पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी व्यक्त केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावलीच्या वतीने आयोजीत पदवी वितरण समारंभात ते बोलत होते.
विद्यार्थी जीवनात अनेक कडु गोड अनुभव घेतांना प्रत्येकांनी मन स्थिर व रागावर नियंत्रण ठेवून परिस्थितीशी तडजोड केली तर अनुभवास आलेले कडु अनुभवही गोड होवून जातात, जीवनात येणा-या प्रत्येक अडचणींचे समर्थपणे तोंड दिल्यास येणा-या अडचणी चुटकी सरशी संपुन जातील. असा विश्वास ठेवून विद्याथ्र्यांनी ध्येय गाठण्यासाठी मार्गक्रमण करावे, असे आवाहनही अनुज तारे यांनी यावेळी केले. भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाबाळ संगीडवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलन करून झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. ए. चंद्रमौली यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शैक्षणीक सत्र 2019-20 मध्यें गोंडवाना विद्यापीठा मधून पदवी व पदव्युत्तर विद्याशाखेत पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सहायक पोलीस अधिक्षक अनुज तारे यांचे हस्ते पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यांत आले. कार्यक्रमाचे औचित्य साधुन महाविद्यालयातील शारिरीक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. भास्कर सुकारे यांना विद्यापीठाने आचार्य पदवीने सन्मानित केल्याबद्दल अनुज तारे यांचे हस्ते डाॅ. सुकारे यांचाही गौरव करण्यांत आला. कार्यक्रमाचा समारोप राजाबाळ संगीडवार यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाने झाला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. विनोद बडवाईक यांनी तर उपस्थितांचे आभार डाॅ. राजश्री मार्कंडेवार यांनी मानले. कार्यक्रमाला कर्मचारी वृंदासह पदवी प्राप्त विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठया संख्येनी उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!