Vidarbh24News

Latest Online Breaking News

संशोधन केंद्रावर विद्यार्थी व सहयोगी मार्गदर्शकाची संख्या वाढवण्याची यंग टीचर्स असोसिएशनची ची मागणी

विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा तालुका

प्रतिनिधी आशिष‌ यमनुरवार..मो.क्र.8855994001

संशोधन केंद्रावर विद्यार्थी व सहयोगी मार्गदर्शकाची संख्या वाढवण्याची यंग टीचर्स असोसिएशनची ची मागणी*

चंद्रपूर- गोंडवाना विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील विध्याशाखेअंतर्गत विविध विषयातील कार्यरत असलेल्या संशोधन केंद्रावर संशोधक विद्यार्थ्यांची संख्या आणि सहयोगी मार्गदर्शकांची संख्या वाढवण्याची मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन केलेली असून यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.श्रीनिवास वरखेडी आणि प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांना निवेदन दिले आहे.

गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीनंतर चंद्रपूर व गडचिरोली परिक्षेत्रात कार्यरत असलेले व नागपूर विद्यापीठ मध्ये आचार्य पदवी चे मार्गदर्शक असणाऱ्या सर्व प्राध्यापकांना गोंडवाना विद्यापीठाने ही समांतर आचार्य पदवी चे मार्गदर्शक म्हणून मान्यता दिलीआहे.त्यानंतर गोंडवाना विद्यापीठाने आपल्या दिशादर्शक निकषाप्रमाने इतर पात्र प्राध्यापकानाही आचार्य पदवीचे मार्गदर्शक म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये विविध विषयांअंतर्गत गाईडची संख्या वाढलेली आहे. मात्र संशोधन केंद्रावर केवळ दोन सहयोगी मार्गदर्शकांची नियुक्तीचा निकष असल्याने अनेक आचार्य पदवीचे मार्गदर्शक केवळ गाईड म्हणून नावापुरतेच उरले आहे. त्याचप्रमाणे संशोधन केंद्रावर प्रवेशित संशोधक विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने संशोधनासाठी अनेक पात्र विद्यार्थ्यांना संशोधन केंद्रावर प्रवेश घेता येत नाही तसेच सहयोगी मार्गदर्शकांची उपलब्धता पण होऊ शकत नाही या जाचक अटीमुळे या परिक्षेत्रातील संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत असून गोंडवाना विद्यापीठाच्या विविधांगी संशोधन प्रक्रियेला खीळ बसलेली आहे. तरी विविध विषयात कार्यरत संशोधन केंद्रावरील प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या व सहयोगी मार्गदर्शकांची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी केली असून या संदर्भामध्ये गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे,सचिव प्रा. विवेक गोरलावर, उपाध्यक्ष डॉ.राजू किरमिरे, उपाध्यक्ष डॉ.नंदाजी सातपुते, सहसचिव डॉ. श्रीराम गहाणे, विभाग समन्वयक प्रा निलेश हलामी, डॉ.प्रफुल्ल बन्सोड, डॉ. अभय लाकडे,प्रा.किशोर कुडे डॉ. लक्ष्मण कामडी ,डॉ पी.एम.राजूरवाडे, प्रा.एच टी. गजभिये यांनी माननीय y HBकुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!