Vidarbh24News

Latest Online Breaking News

*चंद्रपूर जिल्‍हा सिमा ते जुनगांव, देवाडा, नांदगांव या रस्‍त्‍यावरील वैनगंगा नदीवर मोठया पुलाच्‍या बांधकामासाठी केंद्रीय मार्ग निधीतुन 95 कोटी रू. निधी मंजुर होणार*

  • *चंद्रपूर जिल्‍हा सिमा ते जुनगांव, देवाडा, नांदगांव या रस्‍त्‍यावरील वैनगंगा नदीवर मोठया पुलाच्‍या बांधकामासाठी केंद्रीय मार्ग निधीतुन 95 कोटी रू. निधी मंजुर होणार*

    *केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे आ. सुधीर मुनगंटीवार यांना आश्‍वासन*

    चंद्रपूर तसेच गडचिरोली या आदिवासी बहुल नक्षल प्रभावित जिल्‍हयांना जोडणा-या चंद्रपूर जिल्‍हा सिमा ते जुनगांव, देवाडा, नांदगांव या रस्‍त्‍यावरील वैनगंगा नदीवर अॅप्रोच रोडसह मोठया पुलाचे बांधकाम करण्‍यासाठी तसेच जुनगांव येथील पुलाची उंची वाढविण्‍यासाठी केंद्रीय मार्ग निधीतुन 95 कोटी रू निधी मंजुर करण्‍यात यावा अशी मागणी राज्‍याचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय भ़ुतल परिवहन मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्‍याकडे केली आहे.

    ऑगस्ट महिन्‍या अखेरीस गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्‍यामुळे निर्माण झालेल्‍या पुरपरिस्थिती दरम्‍यान पोंभुर्णा व मुल तालुक्‍यातील शेतक-यांच्‍या शेताचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. या पुरपरिस्थितीचा पाहणी दौरा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केला. यावेळी नागरिकांनी चंद्रपूर जिल्‍हा सिमा ते जुनगांव, देवाडा, नांदगांव या रस्‍त्‍यावरील वैनगंगा नदीवर अॅप्रोच रोडसह मोठया पुलाचे बांधकाम करण्‍याची तसेच जुनगांव येथील पुलाची उंची वाढविण्‍याची मागणी आ. मुनगंटीवार यांच्‍याकडे केली. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सदर मोठया पुलाचे बांधकाम व पुलाची उंची वाढविण्‍याबाबत केंद्रीय मार्ग निधीतुन मंजुरी मिळविण्‍याचे आश्‍वासन नागरिकांना दिले होते. सदर आश्‍वासनानुसार त्‍यांनी याबाबत केंद्रीय भुतल परिवहन मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्‍याकडे निवेदन सादर केले असुन त्‍यांच्‍याशी चर्चा केली. सदर पुलाच्‍या बांधकामासाठी केंद्रीय मार्ग निधीतुन 95 कोटी रू. निधी मंजुर करण्‍यात येईल असे आश्‍वासन ना. नितीनजी गडकरी यांनी आ. मुनगंटीवार यांना दिले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!