Vidarbh24News

Latest Online Breaking News

नाल्यावर पुल नसल्याने येरमणार परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यास अडचण

-पुलाचे बांधकाम करण्याची ग्रामस्थांनी केली प्रशासनाकडे मागणी

विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
अहेरी:- अहेरी तालुक्यातील येरमणार येथील नाल्यावर पावसाळ्यात हा नाला भरून वाहत असतो.
२ ते ४ वर्षांपूर्वी भूमकाल संघटनेच्या वतीने या नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यात आले होते परंतु पाण्याच्या अती प्रवाहामुळे नाल्यावरील पुल वाहून गेले. नाल्यावर पुल नसल्याने पावसाळ्यात या परिसरातील १० ते १५ गावांचा तालुक्याशी संपर्क होऊ शकत नाही या परिसरात येरमणार, गुर्जा,कोडसेपली, पालेकसा,कापेवंचा,मांडरा, नैनेर,मदगु,मिचगुंडा रुमलकसा असे विविध छोटे-मोठे गाव आहेत.या गावातील नागरिक पावसाळ्यात शासकीय कामकाजाकरिता किंवा वैद्यकीय उपचारासाठी व विविध कामाकरिता तालुकास्थळी,जिल्हास्थळी येण्यास खुप अडचन निर्माण होत असते.
पावसाळ्यात या परिसरातील शेतकरी, शालेय विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, रुग्ण यांना वेळेनुसार कर्तव्यावर ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत असतो.
या परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात या नाल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या सर्व प्रकारच्या समस्यांचा विचार करून प्रशासनाने या नाल्यावर योग्य वेळी पुलाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!