Vidarbh24News

Latest Online Breaking News

शेतकऱ्यांना भात लागवडीच्या श्री (SRI) पद्धतीबद्दल मार्गदर्शन**

   **शेतकऱ्यांना भात लागवडीच्या श्री (SRI) पद्धतीबद्दल मार्गदर्शन**
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा ता. धामणगावरेल्वे जि. अमरावती येथील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी कु. रुपाली किशोर गोपवार हिने जिल्यातील येणापुर येते भात लागवडीच्या श्री पद्धतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यात भाताच्या लागवठीसाठी मोठया प्रमाणात क्षेत्र आहे तिथे वर्षानूवर्षे पारंपरिक पद्धतीने भात लागवड केल्या जाते. परंतु अयोग्य लागवड पध्दतीमुळे भाताची उत्पादकता कमी आहे याच अनुषंगाने कृषी महाविद्यालयातचे प्राचार्य प्रा. राम गावडे तसेच कृषी कार्यलयानुभव कार्यक्रम अधिकारी चिमोटे, बोन्द्रे , लाडे, आदी तसेच इतर प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली भात लागवडीच्या या नवीन पद्धतीबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने भाताची लागवड न करता श्री SRI पद्धतीने भाताची लागवड केल्यास बियाने कमी लागते त्यामुळे उत्पादन खर्च कमी येऊन उत्पादन तुलनेने जास्त होते. त्याचबरोबर अतिशय सोपी आणि कमी खर्चिक असल्याने शेतकऱ्यांनी ही पद्धत स्वीकारावी ही अपेक्षा यावेळी यक्त करण्यात आली .याप्रसंगी कृषिमित्र तोरे सर आणि शेतकरी नानाजी जक्कुलवार परिसरातील इतर शेतकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!