Vidarbh24News

Latest Online Breaking News

माणकी ग्रामपंचायतेत प्रशासनाचा हलगर्जीने पाण्याच्या डबक्यात झेंडावंदन करण्याची वेळ

माणकी ग्रामपंचायतेत प्रशासनाचा हलगर्जीने पाण्याच्या डबक्यात झेंडावंदन करण्याची वेळ

वणी-  वणी तालुक्यातील माणकी या गावात ग्रामपंचायत कार्यालयात तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रमोद क्षीरसागर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले .परंतु कार्यालयासमोर पाण्याचे डबके साचले असल्यामुळे पाण्याच्या डबक्यात झेंडावन्दन करण्याची वेळ येथील सचिव धुर्वे व येथील प्रशासनाच्या अनास्थेमुळे आली . गेल्या मार्च महिन्यात येथील ग्रामपंचायत येथील सरपंच कार्यकाळ समाप्त झाल्यामुळे येथे प्रशासकाची नेमणूक केली आहे. प्रशासकाकडे एकापेक्षा अधिक गावे असल्यामुळे येथील कारभारावर ग्रामसेवक लक्ष ठेवत आहे. आज 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिन साजरा करण्याकरता ग्रामपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित झाले होते .यावेळी ग्रामपंचायतीचा आवारात चिखल व पाण्याचे डबके पाहायला मिळाले .परिणामी चिखलात व पाण्याच्या डबक्यात झेंडावंदन करण्यात आल्यामुळे येथील ग्रामस्थांची अवस्था चव्हाट्यावर आलेली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी गावकरी करीत आहे

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!