Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी तालुक्यातील यूपीएससी परीक्षेत दोघांनी बाजी मारली असून वणीचा अभिनव तर शिरपूर चा सुमितने यश प्राप्त

*वणी तालुक्यातील यूपीएससी परीक्षेत दोघांनी बाजी मारली असून वणीचा अभिनव तर शिरपूर चा सुमितने यश प्राप्त*

*वणी* : यूपीएससी 2020 चा निकाल काल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत वणी तालुक्यातील दोघांनी बाजी मारली असून वणीचा अभिनव तर शिरपूर चा सुमितने यश प्राप्त करून तालुक्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला आहे
वणी येथिल विवेकानंद विद्यालातुन प्राथमिक शिक्षण पूर्ण करणारा अभिनव प्रवीण इंगोले हा इय्यता 10 वित गुणवत्ता यादीत झळकला होता त्याला मराठी या विषयात महाराष्ट्रातून सर्वाधिक गुण मिळाल्याने ग दि मादगुळकर या पुरस्कार प्राप्त झाला होता त्यानंतर त्याने सांगली येथून इंजिनिअरिंग ची पदवी मिळवली व प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली सहा वेळा त्याला अपयश आले मात्र खचून न जाता त्याने जिद्द व चिकाटीने प्रयत्न सुरू ठेवले आणि यश प्राप्त केले इतर मागासवर्गीय प्रवर्गातून 624 क्रमांक प्राप्त केला आहे त्याचे वडील सेवानिवृत्त शिक्षण असून आई प्राची गृहिणी आहे तर बहीण अंकिता डॉक्टर असून ती पीएचडी करीत आहे तसेच तालुक्यातील शिरपूर या ग्रामीण भागातून आपले प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या सुमित सुधाकर रामटेके याने देखील यूपीएससी परीक्षेत यश प्राप्त केले आहे वडील शिरपूर येथील शाळेत प्रयोगशाळा परिचर होते तर आई ज्योत्स्ना ने इंजिनिअरिंग चा डिप्लोमा केला आहे मात्र दोन मुलांना सांभाळावे लागत असल्याने त्यांनी नोकरी केली नाही घरची परिस्थिती हालाक्याची असल्याने गावातच शिवणकला करून परिवाराला हातभार लावला सुमितने वाराणसी येथील आय आय टी मधून बि टेक ची पदवी प्राप्त केली व यूपीएससी ची तयारी करण्याकरिता नागपूर गाठले दुसऱ्याच प्रयत्नात त्याला यश आले मात्र मिळालेली नोकरीवर रुजू न होता परत एकदा प्रयत्न करण्याचा निर्धार करून पुणे गाठले दिवस रात्र एक करून त्याने अभ्यास केला व यूपीएससी परीक्षेत 748 क्रमांक प्राप्त केला आहे या दोघांनी मिळविलेल्या यशा ने वणी तालुक्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला आहे

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!