Vidarbh24News

Latest Online Breaking News

येवली प्राथमिक आरोग्य पथकाच्या कर्मचारी वर्गाला कार्यालय वेळेचा विसर

मागील दिड महिन्यापासून सुरु आहे सदर प्रकार

विदर्भ 24 न्यूज़
जिल्हा प्रतिनिधी/येवली:- गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अगदी १२ किमी अंतरावर असलेल्या मोठ्या लोक संख्येचे गाव असुन येवली प्राथमिक आरोग्य पथकाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला कार्यालयीन वेळेचा विसर पडल्याचा प्रकार मागील दिड महिन्यासून सुरू आहे. नागरिकांनी वारंवार या प्रकाराची तक्रार संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे केली असून सुद्धा सदर प्रकाराकडे अधिकारी व कर्मचारी कानाडोळा करत असून रुग्णांसोबत अरेरावी ची भाषा वापरली जात आहे.आज मिनार खोब्रागडे यांनी प्राथमिक आरोग्य पथकाला भेट दिली असता सदर प्रकार उघडकीस आला.नवीन वैद्यकीय अधिकारी यांनी पदभार सांभाळून साधारणतः दीड महिना होत असून सुद्धा त्यांनी अजून पर्यन्त योग्य प्रकारे येवली प्राथमिक आरोग्य पथकाची धुरा न संभाळल्याचे निदर्शनास येत आहे.उत्तम स्थितीतील निवासस्थान राहण्याची व्यवस्था येवली प्राथमिक आरोग्य पथकाच्या परिसरात असून सुद्धा वैद्यकीय अधिकारी येवली येथे उपस्थित न राहता गडचिरोली वरून दररोज ये-जा करतात आणि त्यामुळे योग्य कार्यालयीन वेळेवर हजर राहत नाही.सदर प्रकारामुळे लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याचा प्रकार सध्या येवली परिसरात सुरू आहे.

अधिकारी आणि कर्मचारी यांना संबंधित प्रकाराविषयी विचारणा केली असता उडवाउडवीची तसेच उद्धट भाषेत उत्तरे दिली जातात.
जिल्हा मुख्यालायपासून १२ किमी अंतरावर असलेल्या गावात सदर प्रकार सुरू असून दुर्गम भागात काय अवस्था हे यावरून अधोरेखित होते.सदर प्रकारात मा. जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच मा.जिल्हाधिकारी गडचिरोली काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!