Vidarbh24News

Latest Online Breaking News

*जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनाचे सावलीत आयोजन*

*जयभीम वाचनालय, सावली चा पुढाकार*

बाबा मेश्राम सावली

सावली: जयभीम वाचनालय, सावलीद्वारे चंद्रपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन सावली येथील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभागृहात नुकतेच आयोजित करण्यात आले,

सदर अधिवेशनाचे उद्घाटन जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नाकर नलावडे, चंद्रपूर यांच्या हस्ते तर महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ गजानन कोटेवार यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले, यावेळी नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष अनिल बोरगमवार , कार्यवाह भाऊराव पत्रे, कोषाध्यक्ष (ना.वि.ग्रं,संघ) मारोती राऊत, सदस्य नामदेव राऊत , जयभीम वाचनालय अध्यक्ष सौ.लता लाकडे, सावली , डॉ अशोक माथनकर डॉ.सुरेश डोहणे यांची उपस्थिती होती.

उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी ग्रंथालयाचे महत्व विशद करताना ग्रंथ हेच मानवी जीवनास आधार देत असतात,’वाचाल तर वाचाल ‘या वाक्यातच ग्रंथाचे, पुस्तकांचे स्थान किती मौल्यवान आहे हे समजते , असे मत व्यक्त केले.

तर अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा.डॉ.सुरेश डोहणे यांनी ‘ग्रंथालय चळवळीच्या सामाजिक कार्याबद्दल माहिती देतांना ग्रंथालये ही समाज प्रबोधन , साक्षरता आणि सांस्कृतिक संवर्धनाचे साधन आहेत,ग्रंथालये सर्वांपर्यंत ज्ञान पोहचविण्याचे कार्य करतात, शिक्षणास प्रोत्साहन देऊन लोकशाही बळकट करतात व सर्वांना मोफत ज्ञान देतात असे मत व्यक्त केले.

अधिवेशनाचे प्रास्ताविक करताना सो.लता लाकडे. यांनी ग्रंथालये पुस्तकांचे घर नाही तर समाज जागृतीचे केंद्र आहेत ,जे आजीवन शिक्षणाची संधी देतात.असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमांचे सूत्रसंचालन घनश्याम भडके तर आभार डिलक्स डोहणे यांनी मानले.

कार्यक्रमात येणाऱ्या प्रतिनिधींची नोंदणी करण्यात आली,व शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली,

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयभीम वाचनालय सावलीच्या सर्व पदाधिकारी व सभासदांनी सहकार्य केले..

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!