*सावली तालुक्यातील दहा विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड*
“जि.प.प्राथ.शाळा सायखेडा ची प्रगती वाघरे , जिल्ह्यात १३ वी रॅंक”
“नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेत जि.प.शाळेचा वरचष्मा “
सावली: शैक्षणिक सत्र २०२५ -२६ मध्ये नवोदय विद्यालय समितीद्वारे दिनांक १३ डिसेंबर २०२६ ला जवाहर नवोदय प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात आली, सदर परीक्षेमध्ये तालुक्यातील एकुण १० विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा पात्र झाले आहेत यात जि.प.प्राथ.शाळा सायखेडा येथील कु.प्रगती उमाकांत वाघरे हिने जिल्ह्यांत १३ वी रॅंक मिळवून तालुक्याची मान उंचावली आहे ,
विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावलीचे ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, यात कु. गार्गी नितेश रसे ,समीर चरनदास मांदाडे आणि तेजल योगेश वाढई ,तर राणी यशोधरा कॉन्व्हेन्टयेथील त्रिकाल प्रमोद गेडाम(सावली), मोहीनी ओमदेव वडुले (जि.प.प्रा.शाळा जांब(बुज),स्मिष्टी अजित दंडावार(जि.प.शाळा खेडी),तन्वी कुंदन गांगरेड्डीवार (जि.प.शाळा जिबगांव),राखी रमेश रोहणकर आणि कु.रियल संतोष डोंगरे (जि.प.शाळा मोखाळा )
या दहा विद्यार्थ्यांनी परीक्षेत सुयश प्राप्त करून तालुक्याला यशाच्या शिखरावर पोहोचविले आहे.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई – वडील,शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक यांना दिले आहे .तर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गट विकास अधिकारी मुक्तेश्वर कोमलवार, गट शिक्षणाधिकारी वैभव खांडरे, शाळेचे मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत…



