Vidarbh24News

Latest Online Breaking News

*लोकनेते वामनराव पाटील गड्डमवार यांची जयंती साजरी

*:उत्कृष्ठ शेतकरी, गुणवंत विद्यार्थी,प्राध्यापक यांचा सत्कार:*

सावली (प्रा. चंद्रशेखर प्यारमवार)
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली अंतर्गत येणाऱ्या विश्व शांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली,भेंडाळा ,कुनघाडा,मारोडा व बोथली आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक अध्यक्ष ,माजी राज्यमंत्री,सावली तालुक्याचे शिल्पकार ,लोकनेते वामनराव पाटील गड्डमवार यांची जयंती साजरी करण्यात आली.

 


या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे व प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषदेचे आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार देवराव भांडेकर,माजी आमदार नामदेव उसेंडी,साहेबांच्या पत्नी सुशीला गड्डमवार,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, सूर्यकांत खनके, अनिल शिंदे,संस्थेचे अध्यक्ष संदीप गड्डमवार व सचिव राजाबाळ संगीडवार तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मान्यवरांनी वामनराव गड्डमवार यांच्या सामाजिक शैक्षणिक व राजकीय कार्याचा चिकित्सक गौरव केला.शासनाच्या प्रत्येक योजनांचा काटेकोर अभ्यास करून अंमलबजावणी करण्यासाठी त्यांचा अधिकाऱ्यांशी चांगला समन्वय होता म्हणून त्यांनी गावोगावी शिक्षणाच्या सोयी व तळागाळातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या.तसेच त्यांनी वनमंत्री असताना वृक्षारोपण व वनाचा वाटा स्थानिक नागरिकांना मिळावा या हेतूने विविध योजना आणल्या, कुटुंब नियोजन असो की शिक्षणाचा विस्तार असो त्यामध्ये सुधारणा करून सामान्य नागरिकांचे जीवन कसे सुधारेल यासाठी प्रयत्न केले म्हणून चंद्रपूर – गडचिरोली जिल्हा साठी विशेष कृती समितीचे अध्यक्ष असताना भरीव कार्य केले.तसेच या जिल्ह्यांमध्ये शिक्षणाच्या शाखा उघडून ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या संधी त्या काळात उपलब्ध करून दिल्या. या कार्यक्रमांमध्ये समाजातील उत्कृष्ट शेतकरी,गुणवंत विद्यार्थी प्रज्ञावंत प्राध्यापक यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते घेण्यात आला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकेतून साहेबांच्या कन्या नंदा अलुरवार यांनी तयार केलेली गड्डमवार साहेब यांच्या संपूर्ण जीवनावर तयार केलेली चित्रफीत उपस्थितांना दाखविले.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. रामचंद्र वासेकर व डॉ. राजश्री मार्कंडेवार यांनी केले तर आभार कार्यकारी प्राचार्य डॉ.अशोक खोबरागडे यांनी मानले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!