Vidarbh24News

Latest Online Breaking News

मोहफूल वेचायला गेला आणि ठरला बळी

चंद्रपूर :- जिल्ह्यातील नागभीड वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 605 येथे मोहफुलं वेचण्यासाठी गेलेल्या इसमावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवला यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

अरुण महादेव रंधये वय 55 वर्ष असे वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या इसमाचे नाव आहे.

4 एप्रिल मंगळवारी नागभीड वनपरिक्षेत्रातील नागभिड फारेस्ट कक्ष क्रमांक 605 मध्ये अरुण रंधये मोहफुलं वेचण्यासाठी गेला, मोहफुलं वेचत असतांना वाघाने अचानक हल्ला करीत अरुण रंधये याला जागीच ठार केले.

संध्याकाळी अरुण घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता जंगलात अरुनचा मृतदेहच आढळला.

वनविभागाला माहिती दिली असता वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील हजारे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

ग्रामीण भागात उन्हाळ्यात मोहफुलं व तेंदूपत्ता हा मुख्य व्यवसाय असतो, याकरीता ग्रामस्थ मोहफुलं व तेंदू पण संकलन करण्यासाठी जंगलात जातात अशातच वाघांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढतच आहे मात्र याकाळात मानव वन्यजीव संघर्ष वाढणार याची शक्यता नाकारता येणार नाही.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!