राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात व्यक्तिमत्त्व विकास मार्गदर्शन
राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथील कौशल्य विकास समितीच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे वरीष्ठ प्राध्यापक डॉ. दिवाकर उराडे (समाजशास्ञ प्रमुख) होते त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाकरिता नेतृत्व कौशल्य विकसित करा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक डॉ नरेंद्र तुकडोजी आरेकर यांनी विद्यार्थांना नोकरी किंवा व्यवसाय मध्ये यशस्वी करायचं असेल तर शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास करणे अत्यावश्क आहे.यामध्ये प्रामुख्याने संवाद साधण्याची कला, संघभावनेने काम करण्याची कला,समस्या सोडवण्याची कला,लोक कौशल्य इत्यादी विविध गुणकौशल्य आपल्या व्यक्तीम्त्वाबाबत असणे आवश्यक आहे.तसेच त्यांनी म्हंटले की जर तुम्ही आपल्या जीवनात आत्मविश्वास,इच्छाशक्ती,सकारात्मक दृष्टीकोन,क्रियाशीलता, महत्वाकांक्षा (आईस्क्रीम) या मंत्राचा वापर केले तर नक्की तुम्ही जीवनात यशस्वी होणार असे सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच् प्रास्ताविक प्रा. स्मिता राऊत (कौशल्य विकास समिती) यांनी केले .तसेच या कार्यक्रमाचे संचालन कुमारी तनवी मुनघाटे तर आभार रुपाली साखरे हिने मानले. कार्यक्रमाचे आयोजन कार्यकारी प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. राम वासेकर ,प्रा. संदीप देशमुख , प्रा.दिलीप सोनटक्के , प्रा.देवीलाल वाताखेरे, डॉ .किरण बोरकर, प्रा.विनोद बडवाईक,डॉ प्रफुल वैराळे, प्रा.संघानंद बागडे, डॉ.विजयसिंग पवार ,प्रा.प्रकाश घागरगुंडे , प्रा.मुकेश निखाडे,प्रा.आशिष शेंडे, डॉ. राजश्री मार्कंडेवार ,डॉ. रागिनी पाटील इत्यादी मंडळी व विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी हरिभाऊ चचाने,किशोर बोरकर, सातक भाऊ यांचे सहकार्य लाभले.



