Vidarbh24News

Latest Online Breaking News

*कृषि उत्पन्न बाजार समिती ,सावली येथे बैलबाजार भरविण्यात यावा*

कृषी उत्पन्न बाजार समितीची जिल्हाधिका-यां कडे मागणी”

*सावली*(बाबा मेश्राम)—-कृषी उत्पन्न बाजार समिती ,सावलीने जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना पत्राद्वारे मागणी केली आहे की लम्पी चर्मरोगाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात शासनाद्वारे बैलबाजार.भरविण्यास बंदी घालण्यात आली होती,असे असताना ६ जाने.२०२३ च्या पत्रानुसार चंद्रपूर जिल्हयात म्हशीचे बाजार भरविण्यास मान्यता दिलेली आहे,बैल ,म्हशी ,गाय आदी पाळीव जनावरे आहेत,तर सावली तालुक्यात म्हशीचा बाजार भरत नाही तर बैल बाजार भरतो ,बैल बाजार भरविण्यास परवानगी देण्यात अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना केली आहे
उपसमिती व्याहाड खुर्द येथे बैल बाजार नेहमीच भरत होता,,परंतु मागील चार महिन्यांपासून लम्पी या चर्मरोगामुळे बाजारावर बंदी आली आहे, त्यामुळे बैलाचे खरेदी विक्री व्यवहार ठप्प पडले आहेत ,म्हणून शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, म्हशीचा बाजार भरविण्यास मान्यता दिली असल्याने ,तालुक्यात म्हशीचा बाजार भरत नाही ,तर बैलाचा भरत असल्याने त्यास मान्यता देण्यात यावी,सध्या पावसाळी हंगाम संपलेला आहे, शेतकऱ्यांना नवीन बैल खरेदी करून २-३ महिने पालन पोषण करून पुढील पावसाळी हंगामातील मशागती साठी त्याचा उपयोग होतो तसेच तालुका कृषी प्रधान असुन धानपिकासह विविध पिके घेतली जातात,त्यासाठी नागंरणी,पेरणी ,शेती मशागती साठी बैलाची आवश्यकता असते,त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करुन कृषी उत्पन्न बाजार समिति ,सावली ,उपबाजार व्याहाड खूर्द येथे भरणारा पुर्ववत बैल बाजार सुरु करण्यात यावा ,अशी मागणी बाजार समितीने जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना पत्राद्वारे केली आहे….

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!