Vidarbh24News

Latest Online Breaking News

आज सावलीत गायक हेमंत शेंडे आणि संच यांचा संगितमय नजराणा

आज सावलीत गायक हेमंत शेंडे आणि संच यांचा संगितमय नजराणा .
*सुभेदार सार्वजनिक वाचनालयाचा उपक्रम *
*संविधान दिनाचेऔचित्य *
सावली ( लोकमत दुधे )
देशभरात २६ नोव्हेंबर.हा संविधान दिन म्हणून केंद्र व राज्य सरकार द्वारे विविध. कार्यक्रम. घेऊन मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो.त्यामुळे या निमित्ताने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय संविधानावर.विविध चर्चासत्रे, परिसंवादाच्या. माध्यमातून भारतीय संविधान जनमानसात समजावून सांगितले जाते, त्याचाच एक भाग म्हणून सुभेदार रामजी आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचा २६ वा वर्धापन दिन आणि संविधान .दिनाचे औचित्य साधुन आकाशवाणी चे निवेदक तथा सुप्रसिद्ध गायक आणि संच यांचा बहारदार गीतगायनाचा कार्यक्रम समाज मंदिर सावलीच्या भव्य. पटांगणात आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक माजी पालकमंत्री तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आम .विजय वड्डेटिवार तर अध्यक्षस्थानी संदीप गड्डमवार, तर प्रमुख आतिथी रामभाऊ मेश्राम, सावलीच्या नगराध्यक्षा सौ .लताताई लाकडे, माजी नगराध्यक्ष विलास भाऊ यासलवार,न.प सावली चे उपाध्यक्ष संदीप पुण्यपकार,मोतीलाल दुधे ,अड आदर्श गेडाम आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे..


ग्रंथालये हि ज्ञानाची केंद्र बनावित.,शालेय ,महाविद्यालयीन शिक्षणाच्या व्यतिरिक्त ग्रंथालयाच्या ज्ञान,केंद्रातुन ,अभ्यासिका केंद्रातील विविध पुस्तक ,ग्रंथाच्या वाचनातुन ज्ञानात भर पडते व वाचन,ज्ञान माणसाच्या दैनंदिन जिवनात ,पुढील वाटचालीत महत्वाची भुमिका बजावत असते ,सावली सारख्या गावात सुभेदार रामजी आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती करण्यात आली.गेली अनेक वर्षांपासून सदर वाचनालयाची योग्य वाटचाल सुरू आहे , सदर वाचनातुन अनेक शालेय विद्यार्थी ज्ञानसंपदा ग्रहण करीत आहेत.
या वाचनालयाची २६ वर्षाची यशस्वी वाटचाल पुढेही अशीच भरभराटीस यावी या उदात्त हेतुने वाचनालयाचा २६ वा वर्धापन दिन तथा संविधान दिनाच्या निमित्ताने गायक हेमंत शेंडे आणि संच यांचा गीतगायनाचा संगितमय नजराणा आयोजित केला आहे,

तरी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या बहारदार संगीतमय नजराण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक चंद्रकांत गेडाम, बाबा मेश्राम, सुधाकर दुधे ,प्रितम गेडाम, गौतम थोरात, लोकमत दुधे,योगेश गेडाम यांनी केले आहे …….

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!