Vidarbh24News

Latest Online Breaking News

राजुर येथील बोगस डॉक्टरांकडून गरीब रुग्णांची लूट…..

★बोगस डॉक्टर व मेडीकलधारक यांचा सेटिंगनी जोरदार कमाई सुरु असल्याची चर्चा… 

★ डॉक्टरची चिट्ठी यावी म्हणून मेडिकल वाल्यांचे चेले चपाटे डॉक्टरांचा केबिनमधेच बसून चिट्ठी पाठविण्याची  सेटिंग सुरु…

★ काही डॉक्टर तर …आपल्या जवळील औषध देऊन अवाचा सव्वा पैसा वसूल करीत असल्याची चर्चा..

राजुर( 31.मार्च ) :- राजुर येथे आरोग्य सेवेसाठी गावातील आणि पंचक्रोशीतील लोक येतात.पण राजुर येथील बोगस डॉक्टरांकडून अव्वाच्या सव्वा बिले रुग्णांकडून आकारली जात आहेत.मोठ्या प्रमाणावर रुग्णांची लूट होत आहे. मेडिकल आणि डॉक्टर यांच्यातील लागेबांधे लपून राहिले नाहीत.कमिशन पोटी डॉक्टर रुग्णांना आवश्यक नसलेले मेडिकल घेण्यास बाध्य करत आहेत.

.

काही डॉक्टर तर …आपल्या जवळील औषध देऊन अवाचा सव्वा पैसा वसूल करीत असल्याची गावात चर्चा आहे व दूसरी बाब अशी की,डॉक्टरची चिट्ठी यावी म्हणून मेडिकल वाल्यांचे चेले चपाटे डॉक्टरांचा केबिनमधेच बसून सेटिंग करतात व स्पष्टरित्या अमुक अमुक मेडिकल मधे जाण्याचा इशारा देखील करतात .

अशी ही दुर्दैवी अवस्था या राजुर वैद्यकीय क्षेत्रात सुरु आहे. छोट्या छोट्या ( सर्दी ,ताप दुखणे ) साठी 500 कधी 450 रूपयाची चिट्ठी डॉक्टर लिहितात. एकीकडे कोरोनाने जगात थैमान घेतलेला असताना योग्य मजूरी देखील लोकांकड़े नाही अश्या परिस्थितित राजुर येथील आजारासाठी रुग्णांना मोठ्या आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे गरिब रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे.बरेचशे डॉक्टर हे सरकार मान्य पदवी प्राप्त नसताना आपले दुकान मांडून रुग्णांच्या जिवाशी खेळत आहेत.आरोग्य सेवा ही सेवा राहिली नसून लुटमारीचा धंदा झाला आहे. या बोगस डॉक्टरांना आणि मेडिकल वाल्यांची मनमानी आर्थिक लुटीला कुठेतरी आळा बसायला हवा व कमीशन देण्याचा लोभ दाखविणारे मेडिकल धारकांचे परवाने रद्द करुन धडा शिकविणे गरजेचे आहे. अशी जोरदार चर्चा गावात सुरु असल्याचे दिसून येत आहे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!