Vidarbh24News

Latest Online Breaking News

शेतकरी विरोधी काळे विधेयक मागे घ्या, पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडर वरील महागाई कमी करा- कॉंग्रेसची मागणी

वणी 26 मार्च :- शेतकरी विरोधि काळे विधेयक (बिल)मागे घेऊन पेट्रोल, डिझेल व गँस सिलेंडर वरिल महागाई कमी करण्याची मागणी दि.२६ मार्च रोजी कॉंग्रेसच्या वतिने येथिल उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भाजपा प्रणित केंद्र सरकार यांनी संसदेत पारीत केलेले शेतकरी विधेयक (बिल) हे शेतक-्यांच्या हिताचे नसुन व्यापाऱ्यांच्या हिताचे आहे. या विधेयकामध्ये शेतक-्याचे मोठे नुकसान होत असुन आधारभूत किंमत त्यांच्या मालाला मिळणार नाही.

या बिलामध्ये जाचक अटी असून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम हे भाजप केंद्रसरकार करीत आहे. भाजप केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी आहे असे दिसून येते.तसेच केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडर वर भरपूर प्रमाणात किंमती वाढवुन महागाई वाढविली आहे. आज गोरगरीब, शेतमजुर, सामान्य व्यक्तींना अशा महागाईत जीवन जगणे कठिण झाले आहे. ह्या जीवनावश्यक वस्तुच्या किंमती भाजप केंद्रसरकारने वाढवुन नागरिकांना वेठीस धरुन कंबरडे मोडले आहे. करीता शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी विरोधी विधेयक (बिल) केंद्र सरकारने मागे घेण्यात यावे व पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर वरील महागाई कमी करण्यात यावी याकरिता वणी काँग्रेस पक्षातर्फे धरणे आंदोलन करुन निवेदन देण्यात आले.

यावेळी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर,अँड देविदास काळे,विवेक मांडवकर, राजाभाऊ पाथ्रडकर,डॉ.मोरेश्वर पावडे,भैयाजी बदखल,सुनिल वरारकर,प्रमोद लोणारे, प्रमोद निकुडे,रवी देठे यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!