Vidarbh24News

Latest Online Breaking News

होळी,धूलिवंदन व रंगपंचमी साधेपणाने साजरा करण्याचे आदेश ……..

वणी ( 25.मार्च ) :–  कोविड- १९ च्या अनुषंगाने यावर्षी सर्व धर्मिय सण, उत्सव तसेच मोठ्या स्वरुपातील कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत.सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे.

कोविड- १९ चा प्रादुर्भाव अद्यापही असल्याने सर्वांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही.त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षी “होळी, धूलिवंदन व रंगपंचमी” चा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आले आहे.१. होळी/शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. यावर्षी दि.२८/३/२०२१रोजी होळीचा सण आहे. कोविड- १९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही प्रकारे गर्दी न करता सोशलडिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करुन हा सण साधेपणाने साजरा करावा..२. दि. २९/३/२०२१ रोजी धूलिवंदन व २/४/२०२१ रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहेत.दरवर्षी या सणानिमीत्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते. परंतू कोविड- १९ चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धूलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून जनजागृती करणे आवश्यक आहे.

३. होळी/शिमगा निमित्ताने  गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सींगचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घेण्यात यावी.

४. होळी व धूलिवंदन या उत्सवाच्या ठिकाणी मोठ्या स्वरुपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत.

५. प्रस्तुत मार्गदर्शक सूचनांपेक्षा कडक निबंध स्थानिक प्रशासनांनी यापूर्वी लादले असतील तर ते लागू राहतील अथवा या परिपत्रकानंतर देखील कडक निर्बंध लादू शकतील. मात्र प्रस्तुत मार्गदर्शक सूचना यापेक्षा शिथील करता येणार नाहीत.

६. कोविड- १९ च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!