Vidarbh24News

Latest Online Breaking News

गत 24 तासात 253 कोरोनामुक्त ; 222 नव्याने पॉझिटिव्ह  आतापर्यंत 15,736 बाधित झाले बरे  उपचार घेत असलेले बाधित 2,160

चंद्रपूर, दि. 19 नोव्हेंबर:
जिल्ह्यात 253 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच मागील 24 तासात एकही कोरोनाबाधीताचा मृत्यू न झाल्याने गत 11 दिवसांपासूनची कोरोनामृत्यू श्रृंखला तुटल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र 222 नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 18 हजार 173 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 15 हजार 736 झाली आहे. सध्या 2 हजार 160 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 33 हजार 718 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 13 हजार 315 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 277 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 257, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 11, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
नागरिकांनी बाहेर निघतांना काळजी घ्यावी, मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!