Vidarbh24News

Latest Online Breaking News

कोरोना काळातही मिळतोय मुलांना शिक्षणाचे धडे

भिमणी येथील चार तरूणांचा “शाळा बंद शिक्षण चालू” ऊपक्रम

पोंभुर्णा तालुक्यातील भिमणी हे गाव जेमतेम तुटपुंज्या मजुरीवर गुजराण करणारे येथील पालक कोरोणाच्या संकटामुळे शाळा बंद असल्यामुळे शासनाने ठरविलेल्या ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल कसा काय घेऊन देतील.अशा परिस्थितीत आपल्या मुलांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवण्याची इच्छा नसतानाही पालक काही करू शकत नाही.अशातच मुलांचे होणारे नुकसान येथील चार तरुण आविनाश कोडापे,अविनाश गोंधळी,  विशाल नानगिरवार, व सागर कोडापे यांना पाहवत नव्हते.आपल्या गावातील मुले मागे पडू नये हा हेतू ठेऊन मुलांना ट्युशन च्या माध्यमातून निःशुल्क शिक्षणाचे धडे देण्याचा संकल्प केला व मुलांच्या पालकांसोबत सविस्तर चर्चा करून मुलांना ट्युशनला पाठविण्याची विनंती केली. तेव्हापासून त्यांचा ट्युशन चा प्रवास सुरू झाला व आजपर्यंत त्यांनी आपला कर्तव्य समजून मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला.
मुलांना शिक्षण देणे ही ईश्वरीय कार्य असून गेल्या एक महिन्यापासून आम्ही तो न चुकता सातत्याने करीत आलेलो आहे, आणि जो पर्यंत शाळा सुरू होणार नाही तोपर्यंत आम्ही मुलांना शिक्षण देत राहू अशी ग्वाही सुद्धा त्या चार तरुणांनी बोलून दाखवली.
शैक्षणिक प्रगतीसोबत इतर विषयांमध्ये सुद्धा त्यांनी मुलांना मार्गदर्शन करत निबंध लेखन, चित्रकला काढणे, पत्रलेखन, सामान्य ज्ञान, नृत्य स्पर्धा देखील राबवून मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा काम सुद्धा या तरुणांनी मोठ्या आनंदाने करताना दिसत आहेत. यांच्या या उपक्रमामुळे गावकरी खुश असून सर्वत्र त्यांचा कौतुक होत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!