Vidarbh24News

Latest Online Breaking News

उ .प्र . येथील दलित मुलीच्या अत्याचारार्थ नराधम व कसूर करणारे पोलिसांवर कारवाई करण्याची वणी माकप तर्फे मागणीचे निवेदन

● उ प्र दलित मुलीच्या अत्याचाराच्या वणीत माकप तर्फे तीव्र निषेध

वणी : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील ‘चंदपा’ य गावातील दलित कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या केली आणि पोलिसांनी तिचे शव परस्पर जाळून टाकले. या घटनेचा तीव्र संताप व जाहीर निषेध मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने करीत वणी येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन करून ह्या अमानवीय घटनेला दोषी असणाऱ्या नराधमांवर तत्काळ कठोर कारवाई करून कर्त्यव्यात कसून करणाऱ्या उ प्र पोलिसांवर ताबडतोब कारवाई केली पाहिजे तसेच पोलिसांना असे करण्याचे आदेश कुणाचे होते ह्याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

उ प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील दलित मुलीवर झालेली ही घटना निर्दयी व अत्यंत घृणास्पद व अमानवीय आहे. अत्यंत गरीब दलित परिवारातील मुलीने पोट भरण्यासाठी शेतातील काम करताना घडलेली ही घटना सरंजामशाही प्रवृत्तीची आहे.उच्च वर्णीय असलेल्या नरभक्षकांनी सामूहिक बलात्कार करून तिच्या शरीराच्या हाडे तोडून जीभ छाटून अमानुषपणे हत्या केली आहे. घटना घडल्यानंतर ५ दिवसांपर्यंत उ प्र पोलिसांनी गुन्हा सुद्धा दाखल करून घेतला नाही. यामुळे ही घटना उ प्र च्या भाजपच्या योगी सरकारच्या डोळ्यादेखत झाली आहे, त्यामुळे ह्याची नैतिक जवाबदारी ह्या योगी सरकारला घ्यावीच लागेल.

ह्या योगी सरकारच्या पोलिसांनी ह्या पीडित मुलीचे प्रेत आपल्या व्हॅन मध्ये टाकून मुलीच्या आई-वडिलांना सुपूर्द न करता परस्पर त्याच गावातील शेतात नेऊन रात्री २ वाजता जाळून टाकले. एवढेच नाही तर तिच्या आईवडीलांना व नातेवाईकांना घरात बंद करून ठेवले. असे काय सत्य होते की उ प्र पोलिसांना लपवायचे होते ह्याची चौकशी होणे गरजेचे आहे. ह्यामुळे उ प्र सरकारच्या पोलिसांवर आणि भाजप योगी सरकार वर संशय निर्माण झाला आहे. तसेच या घटनेमागील केंद्रातील भाजप सरकारची काय भूमिका आहे हा चर्चेचा विषय बनला आहे. आज पावेतो उ प्र मध्ये दलितांवरील व महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराचे आकडे लक्षात घेता किती लोकांना न्याय दिला आहे, हे जनता ओळखून आहे. उंनाव घटनेतील पोलिसांवर अजूनही उ प्र सरकारने कारवाई केली नाही. करिता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष दलित अत्याचाराच्या विरोधात ठाम भूमिका घेत पीडितांच्या पाठीशी उभी राहत दलितांवर, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई ची मागणी करीत अत्याचार करणाऱ्या नराधमां मागे कोण आहेत ह्याची चौकशी करावी अशी मागणी करीत दलित अत्याचाराचा तीव्र संताप व निषेध व्यक्त करीत निवेदन दिले आहे.
निवेदन देताना कॉ शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी, दिलीप परचाके, नंदू बोबडे, कीर्तन कुलमेथे, कवडू चांदेकर, संजय वालकोंडे, मनोज काळे, प्रभाकर मडावी, उदेभान आत्राम, शंकर नालमवार आदी उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!