Vidarbh24News

Latest Online Breaking News

मशरूम खाल्याने दहा लोकांवर विषबाधा

मशरूम खाल्याने दहा लोकांवर विषबाधा

🚑रुद्रापूर येथील घटना, सर्व विषबाधित व्यक्ती एकाच गावातील.

कवठी प्रतिनिधी

शेतात उगवणारे विषारी मशरूम खाल्याने दहा जनांवर विषबाधा झाल्याची घटना सावली लगतच असलेल्या रुद्रापूर गावामध्ये आज दुपारी घडली.समीर भोयर 22 वर्ष,   शुभम भोयर 20 वर्ष,  प्रणोती भोयर 17 वर्ष,  चंद्रकला भोयर 34 वर्ष,  तेजस्विनी कुकुडकर 13 वर्ष,  दुर्गा कुकुडकर 11 वर्ष, सानिका कुकुडकर 15 वर्ष, दत्ता कडस्कर 5 वर्ष, वर्षा कडस्कर 25 वर्ष, विमल कडस्कर 50 वर्ष या सर्व व्यक्तीना विषबाधा झालेला असून सर्व जण रुद्रापूर येथील रहिवासी आहेत घटनेच्या दिवशी समीर भोयर यांच्या शेतात दोन किलो वजनाचे मशरूम डुंबरावर उगवलेले होते. शेती लगत हा भाग असल्याने शेतात विविध जातीच्या फळभाज्या लावल्या जातात.त्यांचा उपयोग दैनंदिन जीवनात केला जातो  लॉकडाऊन काळात जनता कर्फ्यू असल्याने फळभाज्या व्यवहारात येणे कठीण झाले आहे परिणामी शेतात लावलेल्या, उगवलेल्या भाजीपाल्यावर उपजीविका करण्याची वेळ निर्माण झाली आहे समीर भोयर यांच्या शेतातील दोन किलोचे मशरूम आणल्यानंतर परिसरातील घरशेजारिना देण्यात आले. विषारी मशरूम ची भाजी खाल्यानंतर काही वेळातच उलट्या, पोटदुःखी, फेस टाकणे आदी विकार सुरु झाल्याने ताबडतोब त्यांना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.त्यापैकी समीर भोयर, शुभम भोयर, प्रणोती भोयर, दुर्गा कुकुडकर आणि विमल कुकुडकर या पाच व्यक्तीची प्रकुर्ती चिंताजनक असल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!