Vidarbh24News

Latest Online Breaking News

*वंचित बहुजन आघाडी तालुका पोंभुर्णा तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व भव्य रक्तदान शिबिर संपन्न*

*वंचित बहुजन आघाडी तालुका पोंभुर्णा तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व भव्य रक्तदान शिबिर संपन्न*

भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या 43 व्या स्मृतिदिनानिमित्त मौजा फुटाना येथे वंचित बहुजन आघाडी तर्फे वर्ग दहावी व वर्ग बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन यशस्वीरित्या पार पडले.

रक्तदान हे श्रेष्ठ दान असुन रक्तदान करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चंद्रपुर चे कार्यकर्ते पुढे येत आहेत. जिल्ह्यात रक्ताची कमतरता भासु नये यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे जिल्हाभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणून पोंभुर्णा तालुक्यातील फुटाणा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.अनेक युवा कार्यकर्त्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटक प्रवीण गावतुरे जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जयदीप खोब्रागडे जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर,विषेश अतिथी अशोक पेरकावार मेजर समता सैनिक दल चंद्रपुर, प्रमुख पाहुणे म्हणून धिरज बांबोडे जिल्हा सचिव,श्यामकुमार गेडाम जिल्हा सदस्य, अविनाश कुमार वाळके जिल्हा प्रमुख आयटि सेल वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर, युवा नेते डॉक्टर गावित , शारिका आदेलवार सरपंच फुटाना, चंद्रहास उराडे तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी पोंभुर्णा, कालिदास वनकर नगर शाखा अध्यक्ष फुटाणा, अशोक फलके पोलीस पाटील फुटाना ,दिलीप वाळके, रघुनाथ उराडे,उराडे सर,तावाडे सर, अतुल वाकडे युवा आघाडी,राजु खोब्रागडे शहराध्यक्ष, महेंद्र उराडे समता सैनिक दल,संदिप निमसरकार भारतीय बौद्ध महासभा,रिना उराडे,दुशिला उराडे, विजया भसारकर हे होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात जयदीप खोब्रागडे यांनी रक्तदानाचे महत्त्व युवकांना पटवुन दिले.सोबतच लाकडाऊन मुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला असल्याने चंद्रपुर जिल्ह्यात पुन्हा जनता लाकडाऊन नको असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर बोलले.चंद्रपुर च्या कामगार, मजूर, यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे तो सोडवा आणि खुशाल लाकडाऊन करा असेही त्यांनी सांगितले. अशोक पेरकावार यांनी भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमात वर्ग १० वि व १२ वि च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यात कु श्रेया खोब्रागडे, गौरी चिंचोलकर,शिवम आदेलवार , निकिता वनकर, प्राजक्त पुळके, तेजस्विनी ताकसांडे,यांना शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लोकेश झाडे यांनी तर आभार प्रदर्शन रविभाऊ तेलसे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रुपेश वनकर, सचिन गोंगले,चेतन खोब्रागडे, किशोर माहोरकर, मुन्ना दुधे,प्रविण पौरकर यांनी मोलाचे सहकार्य करुन कार्यक्रम यशस्वी केला.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!