कोरोना योध्यांचा राखी बांधून सन्मान
कोरोना योध्यांचा राखी बांधून सन्मान
सुधिरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य आणि भाजपा महीला आघाडी च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ.ऊमाताई खापरे यांच्या कल्पनेतून साकार करण्यासाठी .ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार. मान अतुलभाऊ देशकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 3/4 – 8 – 2020 ला*रक्षाबंधनाचे *औचित्य साधून तसेच कोरोनाच्या संकटात 24 तास सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी वर्गाचा राखी बांधून व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्वप्रथम चिमुर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार मान.अशोकभाऊ नेते ,मान.अविनाशभाऊ पाल अध्यक्ष भाजपा सावली, मां.संतोषभाऊ तंगडपलीवार सदस्य जि.प,तथा माजी बांधकाम सभापती चंद्रपूर, मान.सतिशभाऊ बोमावार महामंत्री भाजपा सावली,तसेच अनेक सन्माननीय भाजपा पदाधिकारी यांणा राखी बांधून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर सावलीचे ठाणेदार राठोड साहेब आणि त्यांचे सहकारी, पाथरी पो.स्टे चे ठाणेदार घारे साहेब तथा सहकारी, ,प्राथमीक आरोग्य केंद्र अंतरगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ मस्के साहेब आणि सहकारी ,प्राथ.आ.केंद्र पाथरी येथील वैद्यकीय अधिकारी साहेब तथा त्यांचे सहकारी , प्राथ.आ.केंद्र बोथली येथील वैद्यकीय अधिकारी साहेब तथा त्यांचे सहकारी, तसेच तालुका आरोग्य अधिकारी तथा सहकारी ,प्रा.आ.केंद्र व्याहाळ बुज येथील वैद्यकीय अधिकारी तथा त्यांचे सहकारी, प्रा.आ.केंद्र लोंढोली येथील वैद्यकीय अधिकारी तथा त्यांचे सहकारी यांना प्रमानपत्र देऊन,तथा राखी बांधून सन्मानित करण्यात आले ,या प्रसंगी श्रीमती पुष्पाताई शेरकी अध्यक्षा भाजपा म.आ सावली .,सौ.योगिताताई डबले सदस्या जि.प.चंद्रपूर, सौ.प्रतिभाताई बोबाटे उपाध्यक्षा भाजपा म.आ सावली , सौ.छायाताई चेकबंडलवार महामंत्री भाजपा म.आ.सावली ,सौ.शोभाताई बाबनवाडे सचिव भाजपा म.आ.सावली ,सौ.मानसी लाटेलवार शहराध्यक्ष भाजपा म.आ.सावली व इतर भाजपा महिला आघाडी सदस्या ऊपस्थीत होत्या.




