Vidarbh24News

Latest Online Breaking News

ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे पुन्हा गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी

ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे पुन्हा गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी

विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुन्हा सोपविण्यात आली आहे . ना.शिंदे यांच्याकडे गडचिरोली व ठाणे जिल्हयाचे पालकत्व सोपविण्यात आले आहे. मात्र राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता काही काळासाठी गडचिरोली जिल्हयाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपविण्यात आली होती. ना.वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात आलेला पालकमंत्री पदाचा अतिरिक्त भार काढून आता पुन्हा गडचिरोली जिल्हयाच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबतचे शासन परिपत्रक आज २३ जुलै रोजी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!