Vidarbh24News

Latest Online Breaking News

गडचिरोलीत मादगी समाजाचा भव्य वधू-वर परिचय मेळावा व समाज परिवर्तन सभा उत्साहात संपन्न!

विवाहयोग्य युवक-युवतींना मिळाले परिचयाचे व्यासपीठ; सामाजिक एकजूट, शैक्षणिक प्रगती आणि परिवर्तनाचा जागर

गडचिरोली : मादगी समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींना परिचयाची संधी उपलब्ध करून देण्यासोबतच समाजाची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक प्रगती साधण्याच्या उद्देशाने समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, महाराष्ट्र राज्य तथा समता संघर्ष समाज विकास बहुउद्देशीय शिक्षण प्रशिक्षण संस्था, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य वधू-वर परिचय मेळावा व समाज परिवर्तन सभा बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी करिअर मेकर अकॅडमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आयटीआयजवळ, गडचिरोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मोहुर्ले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष मायाताई मोहुर्ले यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विजय देवतळे, तर मार्गदर्शक म्हणून प्रा. विकास गोरडवार व मिहिर फाउंडेशनचे संस्थापक भास्कर मेश्राम उपस्थित होते.

यावेळी संघटनेचे सचिव किशोर नरुले, अनिल बोटकावार, नंदेश्वर कथले, प्रमोद देवतळे, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक बबन नालमवार, ज्येष्ठ नागरिक विजयराव मुळेवार, कैलाश खोब्रागडे सर, सुधीर मुनघाटे, आरोग्य विभागातील परशुराम ईप्पावार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे प्रदेश सहसचिव संदीप येनगंटीवार यांनी केले.

या मेळाव्याला गडचिरोली, चंद्रपूरसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मादगी समाजातील बांधव-भगिनी, विवाहयोग्य युवक-युवती आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

वधू-वर परिचय मेळाव्यात महाकाली असंपल्ली, प्रफुल बोबडे, कुमोद पोहरकर, करण आरिकर, संजय लाटेलवार, सुनील आरेकर, अनिल आरिकर, खुशाल मामीडवार, नोविला मुळेवार आदी विवाहयोग्य युवक-युवतींनी सहभाग नोंदविला.

विवाह परिचयासोबत समाज परिवर्तनाचा व्यापक विचार

या मेळाव्याचा मुख्य उद्देश विवाहयोग्य युवक-युवतींना एकाच व्यासपीठावर आणून परस्पर परिचयाची संधी उपलब्ध करून देणे, पालकांना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे तसेच विवाहविषयक संवादाची सुसंस्कृत व पारदर्शक परंपरा विकसित करणे हा होता.

यासोबतच समाजाची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक प्रगती, युवकांचे संघटन, सामाजिक एकजूट, महापुरुषांच्या विचारांचा प्रसार, संविधानिक मूल्यांची जपणूक आणि समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांना दूर करून आधुनिक, प्रगत व विवेकशील समाजनिर्मिती करण्याबाबत सखोल विचारमंथन करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणे, संघटित शक्ती निर्माण करणे, सामाजिक जागृती वाढविणे, युवकांना योग्य दिशा देणे आणि आर्थिक स्वावलंबन साधणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. विवाह मेळावे हे केवळ विवाह जुळविण्याचे माध्यम नसून समाजातील नातेसंबंध दृढ करण्यासाठी, विचारांची देवाणघेवाण घडविण्यासाठी आणि समाज परिवर्तनाची चळवळ अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरू शकतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

यावेळी समाजबांधवांमध्ये नामदेव आरिकर, दयाराम आरिकर, भगवान गोरडवार, सुभाष कालगट्टीवार, देवानंद बोबडे, एकनाथ आरेकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

सामाजिक एकजूट, परस्पर सहकार्य आणि परिवर्तनशील विचारांचा जागर घडविण्याच्या उद्देशाने आयोजित हा मेळावा मादगी समाजासाठी प्रेरणादायी ठरला. विवाहयोग्य युवक-युवतींना परिचयाचे व्यासपीठ, पालकांना संवादाची संधी आणि समाजाला प्रगतीचा नवा दृष्टिकोन देण्याच्या दिशेने या उपक्रमाने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, महाराष्ट्र राज्य तसेच समता संघर्ष समाज विकास बहुउद्देशीय शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!