Vidarbh24News

Latest Online Breaking News

*उध्दारली कोटी कुळे,..भिमा तुझ्या जन्मामुळे*

*निमित्त -:- जयंती विशेष*

  *मनोगत* -: आकाश खोब्रागडे, सचिव जयंती समारोह अस्थाई समिती, सावली.

*सावली*: वर्षानुवर्षे अंधारकाय जिवन जगत असलेल्या दलित,शोषित , बहुजन समाजाला संविधानाच्या माध्यमातून सामाजिक समता व न्याय मिळवून देणारे संविधान निर्माते,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मामुळेच एक वेगळी पहाट बघावयास मिळत आहे, त्यामुळे आपसूकच मुखातुन शब्द पडतात की “उध्दारली कोटी कुळे,भिमा तुझ्या जन्मामुळे”…

१४ एप्रिल १८९१ साली महु येथे डॉ. बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांच्या जन्म झाला, आणि या देशात हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या जातीभेद, वर्णव्यवस्थेला झुगारून देत संविधानाच्या चौकटीत बसवून लोकशाही प्रदान करुन सामाजिक समता निर्माण झाली. त्यांच्या कार्यामुळेच समाजातील सर्व घटकांत जागरुकता निर्माण झाली.

१३५ व्या जयंतीनिमित्त सावली शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह अस्थाई समितीच्या माध्यमातून भव्य दिव्य जयंती रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहरातील डॉ. आंबेडकर चौकात निळे पताका व आकर्षक रोषणाई करण्यात आली. शहरातील विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन बॅनर लावण्यात आले. सकाळच्या सुमारास महामानवाला अभिवादन करून ध्वजारोहण करून बुद्ध,धम्म, संघ वंदना घेण्यात आली.

संध्याकाळच्या सुमारास जयंती रॅलीचे शहराच्या मुख्य मार्गाने काढण्यात आली. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करणारे उपासक -उपासिका मोठ्या आनंदाने “बाबा तेरे नाम से,जिते है शान से ” एकच साहेब बाबासाहेब…” असा जयघोष करीत होते, तर डिजेच्या तालावर विविध भिमबुध्द गीतावर तरुणाई बेधुंद थिरकताना दिसत होती.. अस्थाई समितीच्या माध्यमातून या रॅलीचे आयोजन करण्यात आले. विविध फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रालीवर तथागत गौतम बुद्धांची महान सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा अनेकांना आकर्षित करीत होत्या आणि शेवटी रमाबाई आंबेडकर विद्यालयात स्थित तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून रॅलीची सांगता झाली यास सावली पोलिसांचे सहकार्य लाभले..

समिती सचिव आकाश खोब्रागडे यांनी विदर्भ २४ न्युज ला पोर्टल न्युज चॅनलशी संवाद साधत जयंती संदर्भात माहिती दिली तसेच आपले मनोगत व्यक्त केले..

आज या जयंतीनिमित्त एवढेच म्हणावेसे वाटते की “उध्दारली कोटी कुळे., भिमा तुझ्या जन्मामुळे…

*शब्द रचना*-

बाबा मेश्राम, उपसंपादक ,विदर्भ २४ न्युज सावली…

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!