Vidarbh24News

Latest Online Breaking News

*जिबगाव येथे कलार समाजातर्फे भव्य निःशुल्क मोतीबिंदू व आरोग्य शिबिर संपन्न*

सावली (जि. चंद्रपूर) : कलार समाज ता. सावली, जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने दि. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जिबगाव येथे निःशुल्क मोतीबिंदू उपचार, शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन महात्मे आय बँक आय हॉस्पीटल नागपूर व जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती चंद्रपूर यांच्या सहकार्याने करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. उद्घाटन डॉ. विजयजी शेंडे यांच्या हस्ते झाले. सहउद्घाटक म्हणून नरसिंग गणवेणवार, अध्यक्षस्थानी चंदुजी मारगोनवार तर विशेष अतिथी म्हणून प्रशांत पाटील चिटनुलवार, अंकुश शेंडे, प्रमोद बोमनवार, दिलीप मंडलवार, जिबगावचे सरपंच पुरुषोत्तम चुदरी, डॉ. गोबाडे (प्रा. आरोग्य केंद्र जिबगाव), डॉ. करडे (प्रा. आरोग्य केंद्र लोढोली), सोनल मॅडम (कॅन्सर तज्ञ, नागपूर) व डॉ. डोगरवार (महात्मे, नागपूर) उपस्थित होते.

या शिबिरात एकूण 375 नागरिकांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी 82 रुग्णांना कलार समाजातर्फे मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. अनेक रुग्णांची कॅन्सर तपासणी करण्यात आली तसेच काही रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले.

कार्यक्रमास डॉ. करडे (वैद्यकीय अधिकारी), समुदाय आरोग्य अधिकारी वृषाली जी. थुल मॅडम, आरोग्य सेवक श्री. घुगे, फ्लेबोटोमिस्ट गिरीश नैताम तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव येथील तपासे सर, जराते सिस्टर, मेश्राम सिस्टर यांनी मोलाचे सहकार्य केले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी राकेश गोलेपल्लीवार (अध्यक्ष, कलार समाज ता. सावली), प्रवीणजी झोडे, आशिष गडपल्लीवार, उमेश गोलेपल्लीवार, नरेश गडपलीवार, प्रशांत मेरफुलवार, नामदेव डांगे, पंकज पाल यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कलार समाज व जिबगाव परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!