राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात संविधान दिन साजरा
सावली: राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली जिल्हा चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 26 नोव्हेंबर संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉक्टर अशोक खोब्रागडे तर प्रमुख अतिथी प्रा. प्रशांत वासाडे होते यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. डॉ. अशोक खोब्रागडे यांनी भारतीय संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान असून संविधानातील मूल्य आपल्यामध्ये आपण रुजवून संविधानाचा आदर सन्मान करणे गरजेचे आहे असे विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रामचंद्र वासेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. दिलीप कामडी यांनी मानले. यावेळी डॉ. भास्कर सुकारे, प्रा. महानंदा भाकरे, प्रा. दिलीप सोनटक्के, डॉ. प्रफुल वैराळे, प्रा. संदीप देशमुख, डॉ. प्रेरना मोडक, प्रा. सदानंद बागडे,डॉ. विजयसिंह पवार, प्रा. मुकेश निखाडे, सागर येल्लटीवार, गिरीश डोंगरे, संदीप गेडाम, गड्डमवार, हरिदास चचाने, किशोर बोरकर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



