Vidarbh24News

Latest Online Breaking News

*राज्यघटनेने ठरवून दिलेल्या मूलभूत कर्तव्याची आठवण – रवींद्र मुप्पावार*

*विश्वशांती विद्यालयात संविधान दिन साजरा 

सावली: २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात संविधान दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळच्या प्रहरी संपूर्ण सावली नगरीतून शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली.संविधानावर आधारित नारे पाहून संपूर्ण सावली नगरी दुमदुमली.
हक्क व प्रतिष्ठेसाठी आग्रह करताना आपल्या कर्तव्याचाही आग्रह नागरिकांनी धरला पाहिजे.धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा गुणधर्म आहे. संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्क व अधिकाराचा अंतर्भाव आहे. स्वातंत्र्य,समता, न्याय, बंधुता ,राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही हा संविधानाचा निश्चय आहे व हा निर्धार नागरिक कर्तव्य पार पाडल्याशिवाय पूर्णत्वास येऊ शकत नाही. असे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार बोलत होते.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यालयाचे शिक्षक अशोक लांजेवार,प्रदीप कोहळे,ज्येष्ठ शिक्षक मिलिंद सुपले यांनी भारतीय संविधानावर प्रकाश टाकला.शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा संविधानावर भाषणे दिली. या प्रसंगी मंचावर विद्यालयाचे पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम,संजय ढवस ,किशोर संगिडवार,श्वेता खर्चे,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन राजू केदार आणि आभार भुजंग आभारे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. उनी

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!