शेतात विद्युत शॉक लागून वडिल ठार तर मुलगा गंभीर जखमी
*मौजा सोनापूर येथील शेतकरी तेजराव भुरसे वय 60 वर्षे शेतात भाजीपाला पिकाला पाणी देत असताना विजेचा शॉक लागल्याने दुर्दैवी निधन झाले. वडिलांना शॉक लागला म्हणून मुलगा धावत वडिलांना वाचविण्यासठी गेला मात्र मुलगा दिनेश भुरसे वय ३८ वर्षे हा देखील गंभीर जखमी झाला. ही घटना गावकऱ्यांना माहीत होताच गावकरी शेतात जमा झाले आणि मुलाला गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. याबद्दल माहिती पोलिस स्टेशन सावली, विद्युत कार्यालय व्याहाड बुज यांना कळविण्यात आली आहे. वडिल मृत्युमुखी पडल्यामुळे आणि मुलगा गंभीर जखमी झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.



