Vidarbh24News

Latest Online Breaking News

कामात दिरंगाई करणाऱ्या कंपनीवर कारवाई करा- हिमानी वाकुडकर

खेडी- गोंडपिपरी रस्ता बांधकाम कासवगतीने

खेडी: गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या खेडी-गोंडपिपरी रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. यामुळे या रस्त्यावर अपघात होऊन अनेक निरपराध व्यक्तींचे जीव गेलेले आहेत. रस्ता अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी व कामात दिरंगाई करणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी नांदगावच्या सरपंच हिमानी वाकुडकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

खेडी-गोंडपिपरी-पोळसा रस्त्याच्या रूंदीकरण, मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी सुमारे २१८ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. हे काम हैद्राबाद येथील एसआरके कंपनीला मंजूर करण्यात आले होते. सदर जात आहे. कंपनीने पोळसा रोडवेज प्रा. लिमिटेड रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करण्यात उपस्थिती होती.

कंपनीला काम करण्यासाठी नेमणूक केली; मात्र या कंपनीने मागील तीन वर्षांपासून अतिशय कासवगतीने रस्त्याचे काम सुरू केले आहे. दोन वर्षात काम पूर्ण करण्यासाठी कंपनीसोबत करारनामा करण्यात आलेला होता; मात्र तीन वर्षांचा कालावधी लोटूनही काम पूर्ण झाले नाही. यामुळे अपघात घडून अनेकांचा जीव जात आहे.

रस्त्याचे काम तात्काळ पुर्ण करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा हिमानी वाकुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. पत्रकार परिषदेला बोंडाळा खुर्दचे सरपंच जालिंदर बांगरे, मूल पंचायत समितीचे माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, जुनाल ग्रामपंचायतचे सदस्य गणेश खोब्रागडे, सुमित आरेकर, बोंडाळा खुर्दचे माजी सरपंच योगेश शेरकी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!