Vidarbh24News

Latest Online Breaking News

*राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षा संपन्न*

सावली:प्रा.शेखर प्यारमवार
राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे गांधी रिसर्च फाउंडेशन जळगावच्या वतीने गांधी विचाराचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महात्मा गांधींचे विचार समजावे यासाठी गांधी विचार संस्कार परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेकरिता कला, वाणिज्य व विज्ञान या विद्याशाखेतील पदवी व पदव्युत्तर वर्गाची विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये प्रथम क्रमांक अजिंक्य पुंडलिक रायपुरे, द्वितीय प्रफुल लक्ष्मण गेडाम , तृतीय पल्लवी शंकर तरारे या विद्यार्थ्यांनी प्राप्त केला या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना गांधी विचार फाउंडेशन च्या वतीने मेडल, प्रमाणपत्र व ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

महाविद्यालयात आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे डॉ. दिलीप कामडी, डॉ. दिवाकर उराडे प्रा. प्रशांत वासाडे यांच्या उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले.परीक्षेचे समन्वयक डॉ. रामचंद्र वासेकर यांनाही गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने परीक्षा आयोजनाबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच महाविद्यालयास उत्कृष्ट सहभागाबद्दल स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.गांधी विचार संस्कार परीक्षा आयोजना संदर्भात महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य अशोक खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात परीक्षा समन्वयक डॉ. रामचंद्र वासेकर यांनी या परीक्षेचे आयोजन केले होते.यामध्ये डॉ. किरण बोरकर,प्रा.स्मिता राऊत, प्रा.चंदा पिसे तसेच इतर प्राध्यापकवृंद व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!