Vidarbh24News

Latest Online Breaking News

*आऊट सोर्सिंग(खाजगीकरण) मुळे सरकारी नौकरी संपुष्टात आणण्याचा शासनकर्ताच्या घाट—-.शिक्षक आम.अडबाले*

“शिक्षक आम.सुधाकर अडबाले यांचा सत्कार समारंभ”

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली ,उपक्रम

*सावली*(लोकमत दुधे/ बाबा मेश्राम)-::-.राजकीय आणि नौकरी क्षेत्रात भारतीय संविधानाने दिलेल्या आरक्षणानुसार अनेक मंत्री,संत्री झाले ,त्याही पलीकडे नौकरी क्षेत्रात अनेकांनी आरक्षणाच्या भरोश्यावर मजल मारली,त्यांमुळे सर्वसामान्यांने शिक्षणाच्या माध्यमातून आर्थिक दर्जा व परिस्थिती सुधारण्यासाठी मोठी मदत मिळाली, मात्र बदलत्या परिस्थितीनुसार आऊट सोर्सिंग (खाजगीकरण)मुळे सर्व सामान्यांच्या सरकारी नौक-या संपुष्टात आणण्याचे षडयंत्र शासना मार्फत केल्या जात असल्याचा सणसणीत आरोप नागपूर विभागाचे शिक्षक आम.सुधाकर अडबाले यांनी व्यक्त केले,ते भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित विश्वशांती विद्यालयात सत्कार मुर्ती म्हणून बोलत होते.
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली च्या वतीने नागपूर विभाग शिक्षक आम,.विधान परिषद ,यांच्या सत्कार सभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ,त्यावेळी मंचावर माजी मंत्री,तथा आम.विजय वड्डेटिवार, समारंभाचे अध्यक्ष संदीप गड्डमवार, सत्कार मुर्ती सुधाकर अडबाले, माजी आम.नामदेव उसेंडी, अनिल.शिंदे,सुर्यकांत खनके,डॉ विवेक शिंदे,राजाबाळ संगीडवार,संजय गड्डमवार, अनिल स्वामी,डॉ विजय शेंडे, कांतीलाल बोरकर, संजय श्रुंगारपवार,संदीप पुण्यपवार, डॉ प्राचार्य अशोक खोब्रागडे, प्रभाकर गाडेवार, रितेश जिडगेलवार ,माजी आम.देवराव भांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते..
‘एकच मिशन जुनी पेंशन ‘या प्रमुख मागणीसह विभागातील शिक्षण क्षेत्रातील अनेक संस्था व कांग्रेस च्या प्रमुख नेत्यांच्या पाठबळावर मी नागपूर विभागाचा शिक्षक बनलो,या देशात जाती पातीच्या राजकारणावर.मतदान केले.जाते, मात्र माझे आडनाव अडबाले असल्याने मला जातीची आडकाठी येऊ शकली नाही, त्यामुळे विरोधकांनी सुध्दा मला मतदान केले आणि मी आमदार झालो,नागपूर विभागात प्राध्यापक, माध्यमिक, प्राथमिक विभागात अनेक जागा रिक्त असून त्याच्या भरती होऊ शकल्या नाही तर निव्वड शिक्षण विभागात १लाखापेक्षा अधिक जागा रिक्त आहेत, तर प्राध्यापक आणि प्राचार्याच्या पदभरती ही मंत्रालयाच्या माध्यमातून होत असल्याने संस्था चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, तर बाह्य कंपनीच्या माध्यमातून नोकरी भरतीचा डाव रचुन सर्व सामान्यांच्या सरकारी नौक-या संपुष्टात आणण्याचा प्रयत्न शासनकर्ता मार्फत होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
…मी नागपूर विभाग शिक्षकांचा आमदार असल्याने शिक्षकांवर.होणारा अन्याय सहन करणार.नाही,’एकच मिशन जुनी पेंशन’ ची टोपी घेऊन मी सभागृहात आवाज उठविणारा एकमेव आमदार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमा दरम्यान भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला महाविकास आघाडीच्या माध्यमातून नागपूर विभाग शिक्षक पदवीधर मतदार वि.प.यातुन.अनेक अमेदवार.प्रयत्नशील असले तरी सुधाकर अडबाले यांच्या शिक्षकासाठी केलेल्या कार्याची दखल घेत कांग्रेस च्या वतीने त्यांचीच जागा निश्चित करण्यात आली,यामध्ये माजी मंत्री,तथा आम.विजय वड्डेटिवार ,माजी मंत्री सुनील केदार ,प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सिंहाचा वाटा असुन नवनिर्वाचित शिक्षक आम.अडबाले यांच्या विजयासाठी मोठा प्रयत्न केला गेला, राज्यात सत्तांतर होताच सुरू असलेल्या परिस्थिती वर.आम.विजय वड्डेटिवार यांनी कडाडून टिका केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाबाळ संगीडवार ,संचालन प्रा राजु.केदार तर आभार सुनील बल्लमवार.यांनी मानले.
यावेळी भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचालीत शाळेचे सर्व कर्मचारी आणि काँग्रेस कार्यकर्ते ,उपस्थित होते..

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!