Vidarbh24News

Latest Online Breaking News

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळातर्फे राजाबाळ पाटील संगीडवार यांचा सत्कार

शिक्षण संस्थाचालकांचे विभागीय अधिवेशन

प्रतिनिधी:प्रा.शेखर प्यारमवार
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे नागपूर विभागीय अधिवेशन कमला नेहरू महाविद्यालय नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते. आयोजित अधिवेशनात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ शाखा चंद्रपूरचे संस्थापक सदस्य तथा भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान सचिव राजाबाळ पाटील संगीडवार यांचा त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. राजाबाळ पाटील संगीडवार हे भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे कार्यतत्पर सचिव असून संस्थेच्या यशस्वी वाटचालीमध्ये त्यांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. शैक्षणिक कार्याबरोबरच सहकार क्षेत्रातही त्यांचे नाव मोठे आहे. वयाच्या 85 व्या वर्षी सुद्धा तरुणांना लाजवेल अशा आगळ्यावेगळ्या शैलीने चंद्रपूर जिल्ह्यात नावारूपास आहेत.
सदर सत्कार माजी केंद्रीय मंत्री मान. विजय नवल पाटील कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांच्या हस्ते माजी मंत्री विनोद गुडधे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. आयोजित अधिवेशनात ग्रामीण भागामध्ये शिक्षण संस्था चालविताना येणाऱ्या अडचणी, पवित्र पोर्टल,वेतनेतर अनुदान, शिक्षकेतर कर्मचारी भरती बंदी, शिक्षण विभागाचे जाचक शासन निर्णय व त्यांचा संस्थाचालकावर होणारा परिणाम अशा अनेक समस्यावर साधक-बाधक चर्चा करण्यात आली.
आयोजित विभागीय अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री विजय वडेट्टीवार,माजी मंत्री सुनील केदार,माजी मंत्री विनोद गुडधे पाटील, स्वागताध्यक्ष विधान परिषदेचे आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर अडबाले,किरण सरनाईक शिक्षक आमदार अमरावती,अशोक जीवतोडे यांची उपस्थिती होती. सदर अधिवेशनात विदर्भातील खाजगी शिक्षण संस्था चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!