Vidarbh24News

Latest Online Breaking News

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात समान संधी केंद्र व सांस्कृतिक विभागा मार्फत महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

प्रतिनिधी:प्रा.शेखर प्यारमवार
राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथील समान संधी केंद्र व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.आज महापुरुषांची चरित्रे,त्यांचे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविने अत्यंत महत्त्वाचे आहे.त्या उद्देशाने थोर समाजसुधारक, समाजपरिवर्तना साठी आपले आयुष्य झोकून देणारे,बहुजन आणि स्त्रियांसाठी शिक्षणाची द्वारे उघडी करण्याकरिता अतोनात कष्ट करणारे सत्यशोधक समाजाचे संस्थापक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारिणी प्राचार्य डॉ अशोक खोब्रागडे हे होते.प्रमुख पाहुणे डॉ. दिवाकर उराडे , डॉ दिलीप कामडी आणि प्रमुख वक्ते डॉ रामचंद्र वासेकर हे होते .डॉ दिवाकर उराडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त बोलत असताना महटले की महात्मा ज्योतीबा फुले यांना जातीयता मान्य नव्हती.त्यांच्या मते माणसाला जात नसते माणूस हा फक्त माणूस असतो हे नैसर्गिक सत्य आहे अशा मतांचे महात्मा ज्योतिबा फुले होते असे त्यांनी सांगितले.तसेच मुख्य मार्गदर्शक डॉ रामचंद्र वासेकर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सागितलं की सामाजिक विषमतेच्या विरोधात आवाज उठविणारे महात्मा ज्योतिबा फुले हे जनसामान्यांच्या,शिक्षणासाठी पुढे सरसावनारे पाहिले महापुरुष होते.त्यांनी बालहत्या प्रतिबंधक, विधवा केशवपन विरूद्ध लढा , विधवा पुनर्विवाह करिता लढा, शेतकर्यांचे शोषण विरूद्ध लढा दिला.असे सांगून विद्यार्थांना सखोल मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक खोब्रागडे सर,यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या दृषटिकोनातून आधुनिक शेती व व्यवसाय याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. स्मिता राऊत (समन्वय अधिकारी,समान संधी केंद्र) यांनी केले .तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रा.संदीप देशमुख (समन्वय अधिकारी समान संधी केंद्र)यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन कार्यकारी प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.संघानंद बागडे,डॉ प्रेरणा मोडक. , प्रा.देवीलाल वाताखेरे, प्रा.विनोद बडवाईक,डॉ प्रफुल वैराळे, डॉ.विजयसिंग पवार व शिक्षकेत्तर कर्मचारी हरिभाऊ चचाने यांचे सहकार्य लाभले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!