Vidarbh24News

Latest Online Breaking News

संपादकीय

सावली तालुक्याच्या विकासाकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील का?
व्याहाड खुर्द ते निफंद्रा मार्ग हा जिल्हा मार्ग दयनीय अवस्थेत आहे. सावली हे मुख्यालयाचे ठिकाण असल्यामुळे या मार्गावरील अनेक खेडेगावातील लोकांना सावलीला अनेक कामासाठी यावे लागते. रस्त्याची दयनीय अवस्था असल्यामुळे मुख्यालायी येताना ज्येष्ठ नागरिकांसोबत इतरांनाही तारेवरची कसरत करावी लागते.
अशीच अवस्था सावली तालुक्यातील प्रत्येकच रस्त्यांची आहे सावली ते हरांबा हा मार्ग सुध्दा तसाच आहे. एकंदरीत सावली तालुक्यातील सर्वच जिल्हा मार्ग त्याच अवस्थेत आहेत.पक्के रस्ते न बनवता फक्त ठिगळ लावली जातात त्यामूळे रस्ता खराबच राहतो या रस्त्याला मागील चार-पाच वर्षापासून ठिगळ सुध्दा लावली नाहीं आहेत. तालुक्यातील रस्त्यांची अवस्था बघता रस्त्यावरुन जाण्याची इच्छा होत नाही परंतु नाईलाजास्तव जावे लागते.

इथल्या लोकप्रतिनिधीनी रमाई भवन बांधण्याचे आश्वासन दिले होते. आज तिन वर्ष पूर्ण झाले परंतु साधा ज्योता किँवा पाया सुध्दा बांधण्यात आलेल्या नाहीं. आज सावली शहरात रमाई जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे परंतु कामाला सुरवात झालेली नाही याचं पद्धतीनें अनेक काम आहेत. नारायण बाबा क्रीडांगणासाठी २ कोटी रुपये, नाविन बस स्थानकामागे २ कोटीचा बगिचा मंजूर केले होते परंतू यापैकी एकही काम पुर्ण झाला नाही.सावली तालुक्यातील हा पूर्वी पासूनच उपेक्षित तालुका म्हणून ओळखल्या जाते. बाजूचा मूल, पोंभुर्णा तालुक्याकडे पाहिले असता हेवा वाटतो परंतू सावली तालुक्याची अवस्था दयनीय आहे. परिस्थिती जैसे थे च राहील की तालुक्यांतील लोक प्रतिनिधि याकडे लक्ष देतील का? असा प्रश्न तालुक्यांतील नागरिक विचारत आहेत.या परिसरातील लोकपरतिनिधींनीही याकडे लक्ष देतील का की आलेया भोगासी असावे सादर या म्हणी प्रमाणे सामान्य नागरीकांना लोकपरतिनिधींनीही निवडून दिल्याचे फळ भोगावे लागेल काय की लोकप्रतनिधींनीही या नात्याने काही उपाय योजना करतील काय याकडे सावली तालुक्यातील नागरीकांचे लक्ष लागले आहे. नागरिकांची लोक्रतिनिधींनीही कडे काही अपेक्षा असते देशाचा नाही तर किमान आपल्या निर्वाचन क्षेत्राचा विकास होईल या अपेक्षेने लोक लोक्रतिनिधींनीही कडे पाहात असतात मात्र ही अपेक्षा पुर्ण होइल कि अपेक्षा भंग होइल याकडे तालुक्यांतील नागरीकांचे लक्ष लागले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!