Vidarbh24News

Latest Online Breaking News

*१३ वेळा रक्तदान करणारा सावलीतील दानशूर रक्तदाता कमलेश गेडाम*

“युवकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे – कमलेश गेडाम चे आवाहन+

*सावली*-(बाबा मेश्राम)- सावली शहरात रहिवासी सावली तालुका कांग्रेस कमेटी सोशल मिडीया अध्यक्ष कमलेश गेडाम यांने १३ वेळा रक्तदान करुन अनेक गरजवंताचे जीव वाचवण्यासाठी मदत केली आहे,
आज रोजी (८जाने) ,राजोली फाल येथील प्रथमेश बोरकुटे वय १६ वर्षे इयत्ता १० मध्ये शिकणारा मुलगा अतिशय कमी रक्त असल्याने त्याला तातडीने सावली इथून जिल्हा ग्रामीण रुग्णालय गडचिरोली इथे भरती करण्यात आले.रुग्णालयात रक्तसाठा कमी असल्याने मोठी समस्या निर्माण झाली.यावेळी राजोली फॉल येथील युवक अंकुश बाबनवाडे यांने सकाळी सावली तालुका काँग्रेस कमिटी सोशल मीडिया चे अध्यक्ष कमलेश गेडाम यांना संपर्क साधला असता आज सकाळी ९:०० वाजता पासून ते रुग्णाल्यात उपस्थित होते व त्या मुलाला रक्त दिले.या वेळी त्या मुलाचा आई वडिलांनी व राजोली फॉल येथील समस्त गावकाऱ्यांनी कमलेश गेडाम यांचे आभार मानले.
कमलेश गेडाम हे लोकांना आवाहन करताना म्हणतात कि आज मला १३ व्यांदा रक्तदान करताना अतिशय आनंद होते आहे कि माझ्यामुळे कोणाचे जीव वाचले.


सर्वांना माझी नम्र विनंती आहे कि कमीत कमी वर्षातून एकदा रक्तदान करावे.आपल्या या महादाणामुळे कोणाचे तरी प्राण वाचू शकतात, दानात दान रक्तदान असल्याने,आज रक्तपेटी मध्ये रक्तदात्यांनी रक्तदान न केल्यामुळे रक्ताची कमतरता भासत आहे. या मुलाला जशी रक्ताची गरज भासली उद्या कोणी आपल्या कुटुंबातील असू शकतो,त्यामुळे युवकांनी रक्तदान करण्यासाठी समोर यावे,असेही आवाहन त्याने केले…

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!