Vidarbh24News

Latest Online Breaking News

मादगी समाजाचा राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा संपन्न

मादगी समाजाचा राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा संपन्न
दिवंगत भजनदास आलेवार बहुउद्देशिय संस्था गडचिरोलीच्या वतीने दिनांक १५ जानेवारी २०२३ ला राज्यस्तरीय मादगी समाज वधू वर परिचय महामेळाव्याचे आयोजन गोंडवाना कला दालन केंद्र गडचिरोली येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. समया पसुला होते.तर उदघाटक प्रा.सोनवणे होते. तर प्रमुख अतिथी मा.सुनील  मिद्दे ,प्रा. एच.बी. नक्कलवार , प्रा. डॉ. संजय लाटेलवार .किशोर नगराळे ,के. डी. देवगडे, एम. ई. कोमलवार , गोपाल रायपुरे ,मा. मुरलीधर लाटेलवार ,लालाजी पोवरे ,गडसुलवार सर.नत्थुजी नगराळे , प्रा.डॉ. देवानंदजी गोरडवार ,लताताई लाटकर ,बबनजी गोरंतवार , मा.राजेशजी कलगट्टीवार ,विनोद लाटेलवार ,मिलिंद शास्त्रकार , मा. रामचंद्र आसमपल्ली ,प्रभाकरजी वासेकर, नत्थुजी गोडसेलवार , प्रा.रवि देऊलवार देवाजी लाटकर, शंकरजी सिट्टलवार ,लक्ष्मणजी मोहुर्ले ,नेमीचंदजी बोलीवार ,.रविजी नल्लूरवार सुरेंद्रजी चनेकार , नरेंद्र वासेकर, दर्शना वाघमारे ,नारायणजी इप्पावार, भिमराव ईटकेलवार , रुपचंद लाटेलवार ,महेश जिल्हेवार, नंदुभाऊ कथले, राकेशभाऊ मंथनवार उपस्थित होते.
गडचिरोली,चंद्रपूर,नागपूर, यवतमाळ,वर्धा जिल्ह्यातील वधू वर परिचय देण्यासाठी उपस्थित होते.पन्नास वधू वर यांनी स्वतःचे परिचय दिले.प्रस्तुत वधू वर परिचय मेळाव्यात वधू वर यांनी स्वतःच परिचय देताना आपली अपेक्षा सुध्दा व्यक्त केली.मादगी समाजात विवाह जोडणीसाठी अनेक समस्या पालकांना येतात.म्हणून समाजातील सर्व वधू वर यांना एकत्रित आणण्याचे कार्य या माध्यमातून संस्थेने केले.
उपस्थित पाहुण्यांनी संस्थेचे कौतुक करीत आभार व्यक्त केले. संस्थेने भविष्यात असेच कार्य करावे असा आशावाद पण व्यक्त केले.
प्रस्तुत कार्यक्रमात मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष विकास गोरडवार यांनी केले. तर प्रास्ताविक व आभार प्रा.अरुण आलेवार यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाची भूमिका संस्थेचे अध्यक्ष संजय पवार,सचिव प्रणय गोरडवार,कोषाध्यक्ष सुनीता भजनदास आलेवार,संस्थेचे सदस्य सुधीर मुंघाटे, देवेंद्र लाटकर, अनंत पोवरे,सौ. ईशा अरुण आलेवार, संतोष मुंघाटे,किशोर देवतळे, योगेश गोरडवार, अंकित पवार, यशवंत लाटकर यांनी पार पाडली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!