Vidarbh24News

Latest Online Breaking News

५७ विद्यार्थीनीत दोन प्रसाधन गृह , दोन संडास ……

५७ विद्यार्थीनीत दोन प्रसाधन गृह , दोन संडास ……
* भाड़ेतत्वातील आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाची व्यथा
* विद्यार्थी पालक व संघटनेचे वरीष्ठाना निवेदन *
* अधिका ऱ्याचे दुर्लक्ष *
सावली ( लोकमत दुधे )
सावली तालुक्यातील आदिवासी समाजाची लोकसंख्या लक्षात घेता तालुक्याच्या मुख्यालयी आदिवासींच्या मुलांना व मुलींना शैक्षणिक दर्जा व शैक्षणिक सुविधा व्हावी म्हणून शासकीय आदिवासी मुल, मुलींसाठी वसतिगृहाची निर्मिती करण्यात आली . दोन्हीही वस्तीगृहाला शासकीय इमारत नसल्यामुळे सध्या खाजगी इमारती मध्ये भाडेतत्त्वावर वस्तीगृह सुरू करण्यात आले मात्र मुलींची वस्तीगृहातील संख्या ५७असून चार रूम , संडास दोन ,बाथरूम दोन असल्याने मुलींना शौचालयाला जाण्यासाठी व आंघोळ करण्याकरिता रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे मुलींची शाळेच्या वेळेवर तयारी होऊ शकत नाही त्यामुळे त्यांचा शाळेतिल वेळेचा खेळ खंडोबा होत आहे चार रूम असल्यामुळे प्रत्येक रूम मध्ये १०/१५ मुलींना बेड नसल्यामुळे खाली आणि एक गादी वर दोन दोन मुली झोपन्याची वेळ निर्माण झाली आहे गर्दीमुळे अभ्यासावर सुद्धा मुलींच्या परिणाम होत आहे त्यामुळे मानसिक व शारीरिक त्रास सुद्धा मुलींना सहन करावे लागत आहे. आदिवासी मुलींचे वस्तीगृह नॅशनल हायवे ला लागून असल्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनांचा कर्कश आवाज येत असते आणि दोन्ही बाजूला दारुचि दुकाने असल्यामुळे अनेकदा दारू पिणारे व्यक्ती आंबट शौकीन मुले केव्हा केव्हा मुलींना बघून शिट्ट्या मारत असतात या ठिकाणी ग्रंथालय नाही पार्किंग नाही प्लेग्राउंड नाही आदि अनेक समश्या ना शिक्षण घेता समोर जावे लागत आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण होत असल्यामुळे सावली तालुक्यातील अद्यावत असलेले मुलींचे वस्तीगृह इमारत बदलवून दुसऱ्या ठिकाणी सोय करण्यात यावी अशी मागणी यापूर्वी विद्यार्थ्यांनी गृहपाल व प्रकल्प अधिकारी यांच्याकडे त्याचप्रमाणे सावली तालुक्यातील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडे मागणी करून एक महिन्याचा कालावधी लोटलेला असून प्रकल्प अधिकारी मागण्या कडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असून संघटनेला व पालक ,विद्यार्थी यांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे बोल्ल्याचे जात आहे
तालुक्यातील मुलींच्या वस्तीगृहाला प्रकल्प अधिकारी मृगनाथन व त्यांच्या कमिटीने यांनी प्रत्यक्ष येऊन व्हिजिट केली आणि मुलींना होत असलेली गैरसोय जाणून घेतली व दोन दिवसांमध्ये इमारत आम्ही बदलवून देण्याचे मुलींना आश्वासन देण्यात आले मात्र कुठे माशि शिंकली कुणास ठाऊक मात्र वस्गिगृहात योग्य सोय सुविधा नसल्याचे मुलीनकडून सांगितले जात आहे
त्यामुळे विद्यार्थिनींनी एक लेखी तक्रार अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेला दिले विद्यार्थ्यांनी च्या समस्या संघटनेच्या माध्यमातून सोडवण्याकरिता संघटनेकडे लेखी तक्रार दिल्याने नवीन इमारत उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने सावली येथील मुलीच्या वस्तीगृहासमोर आंदोलन करण्यात येईल अशा इशारा जिल्हा अध्यक्ष अतुल कोडापे, तालुकाध्यक्ष प्रवीण गेडाम, लखन मेश्राम, रमेश कनाके, उतम गेडाम, पुरुषोत्तम पेंदाम, भास्कर गेडाम, मयूर गेडाम, श्यामसुंदर उइके आदी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे ……

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!