Vidarbh24News

Latest Online Breaking News

*विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न*

*विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न*
*प्रतिनिधी*.
स्थानिक विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे दिनांक २९, ३० आणि ३१डिसेंबर २०२२ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला.
वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मान.अनिलभाऊ स्वामी उपाध्यक्ष,भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली यांच्या हस्ते पार पाडण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बौद्धिक आणि शारीरिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शालेय स्तरावर करणे महत्त्वाचे असते असे त्यांनी उद्घाटन पर मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय राजाबाळ पाटील संगीडवार, सचिव भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ.विजयभाऊ शेंडे,अंकेक्षक श्री सुनीलजी बल्लमवार, सदस्य रितेशजी जिडगलवार, सदस्य रामभाऊजी येनुगवार, नगरसेवक गुणवंत सुरमवार, प्रीतम गेडाम, साधनाताई वाढई, ज्योतीताई शिंदे, अंजलीताई देवगडे, सीमाताई संतोषवार, पर्यवेक्षक राऊत सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रवींद्र मुप्पावार सर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.


तीन दिवसीय *वार्षिक स्नेहसंमेलनात* विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धा, बचाव स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा अंताक्षरी स्पर्धा कबड्डी स्पर्धा, रनिंग स्पर्धा, गोळा फेक स्पर्धा, अशा विविध मैदानी आणि बौद्धिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर स्नेहसंमेलनात विद्यालयाच्या स्काऊट व गाईड च्या पथकाने सहाय्यक शिक्षक जीवतोडे सर आणि सहाय्यक शिक्षिका उर्मिला बारेकर यांच्या मार्गदर्शनात *आनंद मेळाव्याचे* आयोजन करण्यात आले.
दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रामध्ये सायबर क्राईम, पोस्को ॲक्ट, आणि स्पर्धा परीक्षा यावर सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय आशिषजी बोरकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आली.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय संदीप भाऊ गड्डमवार,अध्यक्ष भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली हे होते. शालेय कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुद्धा तेवढ्याच उत्साहाने सहभाग नोंदवावा त्यामुळे विद्यार्थ्याच्या उत्साहात पुन्हा भर पडेल असे ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते, प्रमुख पाहुणे म्हणून माननीय राजाबाळ पाटील संगीडवार सचिव भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली, कार्याध्यक्ष माननीय सौ. रमाताई गड्डमवार,अंकेक्षक माननीय सुनीलजी बल्लमवार, शाळेचे मुख्याध्यापक श्री रवींद्र मुप्पावार, पर्यवेक्षक राऊत सर उपस्थित होते. विविध स्पर्धेमध्ये क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते *प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह* देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!