Vidarbh24News

Latest Online Breaking News

*विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*

*विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*
प्रतिनिधी :
भारत शिक्षण प्रसारक मंडळ, सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये मोठ्या उत्साहात सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम संपूर्ण सावली नगरातून शालेय विद्यार्थ्यांची जनजागरण रॅली काढण्यात आली.*जय ज्योती जय क्रांती* च्या जयघोषाने सावली नगरी दुमदुमली. त्यानंतर शालेय परिसरात कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय रवींद्र मुप्पावार सर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक राऊत सर,सुपले सर, खर्चे मॅडम,बिडवई मॅडम,बारेकर, मॅडम,कोतपल्लीवार मॅडम, गेडाम मॅडम,देवतळे मॅडम मंचावर उपस्थित होते.


जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून खर्चे मॅडम यांनी स्त्री शिक्षण तसेच समाज परिवर्तनाची दिशा आणि तत्कालीन समाज परिस्थिती यांची सांगड घालत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्याकडून भाषणे आणि गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या संचालन कनिष्ठ महाविद्यालय शिक्षिका प्रसन्ना मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सहाय्यक शिक्षिका गेडाम मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!