Vidarbh24News

Latest Online Breaking News

वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाची चमू जंगलाकडे रवाना

वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाची चमू जंगलाकडे रवाना
प्रतिनिधी :-
वनपरिक्षेत्र अधिकारी, सावली अंतर्गत येणाऱ्या गावातील जंगलाकडे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी ७ पिंजर्‍यासह जंगलाच्या दिशेने रवाना झाले. सलग दोन दिवस, रुद्रापुर येथील एक व्यक्ती आणि खेडी येथील एक महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना घडली आणि काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


सतत होणारे वाघाचे हल्ले व नागरिकांचे जाणारे जीव ही चिंतेची बाब असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. सुधिर मुनगंटीवार यांनी वाघांचा बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा निलंबनाच्या कार्यवाहीचे आदेश दिलेले आहे. त्यामुळे वन अधिकारी व कर्मचारी नरभक्षक वाघास जेरबंद करण्यासाठी दिवसरात्र रेस्क्यू आॅपरेशन राबवित आहेत. सतत होणार्‍या वाघाच्या हल्ल्याच्या घटनेमुळे सावली परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!