दिपक पेंदाम विद्युत सहाय्यक यांचा विद्युत शॉक लागून दुर्दैवी अंत
दिपक बाळु पेंदाम वय 32 वर्षे राहणार खेडी तालुका सावली है पोंभूर्णा येथे विद्युत सहाय्यक (लाईनमन) म्हणुन मागील दोन वर्षापासून काम करीत होते.

दिवाळीच्या पर्वावर लोकांच्या घरात प्रकाश पाडण्यासाठी गेले असता त्यांच्याच घरात कायमचा अंधकार पसरला पॉम्भूर्णा येथिल चौकातील विद्युत खांबावर लाईन दुरुस्त करित असताना विद्युत करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन लहान मुली व आई असा आप्त परिवार आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे



