शरदराव पवार महाविद्यालयात अर्थशास्त्र क्लबची स्थापना
शरदराव पवार महाविद्यालयात अर्थशास्त्र क्लबची स्थापना
गडचांदूर – येथील शरदराव पवार कला वाणिज्य महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विषयातील विविध उपक्रम व प्रकल्प घेण्याच्या दृष्टीने अर्थशास्त्र क्लबची स्थापना महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेश गायधनी यांचे मार्गदर्शनामध्ये करण्यात आली. अर्थशास्त्र विषया अंतर्गत विविध संकल्पनेवर आधारित चर्चासत्र व कार्यशाळा आयोजित करणे, विविध प्रकल्प आणि उपक्रम यांची तयारी, क्लबच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक सक्षमीकरण संदर्भात सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे हा या क्लब स्थापनेचा मुख्य उद्देश आहे.



