Vidarbh24News

Latest Online Breaking News

ट्रकच्या धडकेत आजी- नातवाचा मृत्यू

* राष्ट्रीय महा .सावली येथील महात्मा फुले चौ कातिल घटना *

चारचाकी आयसरची दुचाकीला जब्बर धड़क होऊन दोन जन जागिच ठार झाल्याची घटना नुकतीच घडली असून त्यात आजी नातवाचा समावेश आहे सावली ते गडचिरोली महामार्गावरील ज्योतिबा फुले चौकात भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेही घटनास्थळीच ठार झाले. सदर घटना सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. देवानंद उर्फ बबलू दादाजी किनेकार वय २८ वर्ष व लक्ष्मीबाई आनंदराव किनेकार वय ७८ वर्ष असे मृतकाचे नाव असून दोघेही सावली तालुक्यातील शिर्शी येथील रहिवासी होते.


सविस्तर वृत्त असे की मृतक हे सावली येथील नातेवाईकांना भेटून दुचाकी क्र. एम एच ३४ बिके झिरो ० १४५ या वाहनाने आपल्या स्वगावी शिर्शी कडे जात असताना मागून येणारा ट्रक क्र. एम एच ४९ – ११२७ या वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही चारचाकी आयसरच्या चाकाखाली आले. या धडकेत दुचाकीस्वार व त्याची आजी यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली. सावली चे ठाणेदार अशिष बोरकर हे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग सावली शहरातून जात असल्याने या मार्गावरून भरधाव वेगाने वाहने धावत असतात. अपघातास आळा घालण्यासाठी या मार्गावर गतिरोधक लावण्याची मागणी केल्या जात आहे मृतकाच्या अकाली निधनाने परिवारात शोककडा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केलि जात आहे राष्ट्रीय महामार्ग झाल्याने आणि आवश्यक ठिकाणी गावालगत गतिरोधक नसल्याने भरधाव वाहने जात असल्याने अपघाताला आमंत्रण दिले जात असून त्यामधे निरपराध जीवाणा आपला प्राण गमवावा लागत आहे ……

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!