चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील त्या नदीजवळ चारचाकीने दुचाकी स्वारास उडविले
चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावलीपासून पाच किमी अंतरावर असलेल्या चिमडा नदीच्या पुलाजवळ दुचाकी व चार चाकी मध्ये भीषण अपघात होऊन त्यात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 25 ला सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडली आहे.
सावली तालुक्यातील रुद्रापूर येथील शुभम नीलकंठ नरुले (वय 22) असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव असल्याचे कळले आहे. तो मूल वरुन सावली कडे येत असतानाच गडचिरोली वरुन चंद्रपूर कडे जाणाऱ्या चार चाकी शिफ्ट गाडीने त्याला उडविले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला असून सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.



