मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सीबीएसई शाळेत महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
•1 मे 2006 रोजी वणी शहरात एकमेव मॅकरून सिबीएसई शाळेची स्थापना…
•शाळेला 16 वर्ष पूर्ण आणि स्थापना दिवस उत्साहात …
वणी ( 1 मे ) :- मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सिबीएसई शाळेत आज संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा 62 वा वर्धापन दिन आणि कामगार दिन व शाळेचा स्थापना दिवस ध्वजारोहण करीत अति उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र हे सुरवातीपासूनच विविध क्षेत्रात अग्रणी असलेले राज्य आहे. गत दोन वर्षात कोरोनाच्या तसेच नैसर्गिक संकटावर मात करून आज सर्व उत्साहाने व गर्वाने मी मराठी म्हणून जमलो अशी प्रतिक्रया देखील येथिल मुख्यद्यापिका श्रीमती शोभना यांनी दिली.

1 मे 1960 रोजी अनेक राज्याच्या विभाजनापासून महाराष्ट्र राज्य स्थापन केले गेले. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. शिवाय हा दिवस कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो.
या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती शोभना तर प्रमुख पाहुणे म्हणून दामले तसेच संचालन नीलिमा सुत्रावे यांनी केले.तर या कार्यक्रमाचा यशस्वीतेकरीता संगीता पवार (सांस्कृतिक शालेय कमिटी अध्यक्ष व समस्त शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.




