Vidarbh24News

Latest Online Breaking News

अरुणा खंडाळकरांच्या नेतृत्वात गाडेगाव सोसायटीवर काँग्रेसचा झेंडा

•अध्यक्षपदी सतिशचंद्र  खंडाळकर तर उपाध्यक्षपदी दीपक इरदंडे.

मारेगाव (1 मे ):- नुकत्याच पार पडलेल्या मार्डी विभागातील गाडेगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत विरोधकांना धूळ चारत,खंडाळकर गटाने विजयाची परंपरा कायम ठेवली.यात माजी जि.प.सदस्या काँग्रेसच्या नेत्या अरुणा अरुण खंडाळकर यांचे नेतृत्वात गाडेगाव सोसायटीवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा रोवण्यात आला.

निवडणुकीत अरुणा खंडाळकर व कलावती राऊत या अविरोध निवडुन आल्या. यावेळी मारेगाव येथील खरेदी विक्री कार्यालयात निवडणूक संचालकांच्या उपस्थितीत गाडेगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड प्रक्रिया पार पडली.यात अध्यक्ष पदाची माळ सतिशचंद्र बाबाराव खंडाळकर यांचे गळ्यात तर उपाध्यक्ष पदाची दीपक कवडुजी इरदंडे यांचे गळ्यात पडली.तर सदस्य म्हणून अरुणा खंडाळकर, कलावती राऊत,संजय ढाले,सुभाष पिंपळशेंडे,गिरीधर पाके,सुरेश तुमराम,पंकज इरदंडे,मंदा कुमरे,शेषराव गमे,पुरुषोत्तम राऊत यांची निवड करण्यात आली.

या निवडणुकीत माजी जि. प.सदस्या अरुणा खंडाळकर तालुका काँग्रेस कमेठीचे अध्यक्ष मारोती गौरकर आदींनी परिश्रम घेतले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!