श्रीराम जन्मोत्सव समितीद्वारा भव्य मोफत नेत्र चिकीत्सा आणि रक्तदान शिबीर…
●समितीचे अध्यक्ष विजय चोरडिया यांचा पुढाकाराने समस्त लाभार्थ्याना मोफत औषधे देण्यात येणार…
●शिबीरात येतांना राशन कार्ड व आधारकार्ड सोबत घेऊन यावे असे आवाहन- विजय चोरडिया (अध्यक्ष)
वणी( 5 एप्रिल ) :- श्रीराम जन्मोत्सव समिती वणी द्वारा भव्य नेत्रचिकीत्सा शिबीर व रक्तदान शिबीराचे आयोजन दिनांक ०८ एप्रिल २०२२ सकाळी ११ वाजता श्री विनायक मंगल कार्यालय, छोरिया लेआऊट गणेशपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. 
विशेष बाब म्हणजे हे की,कस्तुरबा हॉस्पीटल सेवाग्राम येथील नेत्रतज्ञांच्या चमुच्या माध्यमातून नेत्रचिकीत्सा करण्यात येणार आहे. या नेत्रचिकीत्सा शिबीरात जे नेत्ररुग्ण तपासणी अंती चष्म्यांसाठी पात्र ठरतील त्यांना मोफत चष्मे, औषधी व आय ड्रॉप समिती तर्फे वितरीत करण्यात येईल. तसेच जे मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरतील त्यांच्यावर कस्तुरबा हॉस्पीटल सेवाग्राम येथे मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येईल.
त्याचप्रमाणे लाईफ लाईन ब्लड बँक नागपूर यांच्या सहयोगाने विविध प्रकारचा रक्त तपासण्या ब्लड शुगर तपासणी, RBC, CBC,BMD, BM चाचणी इ. सुविधा आवश्यक निवडक रुग्णांना मोफत उपलब्ध करण्यात भव्य करण्यांत येत आहे. सर्व रुग्णांकरीता व रक्तदात्यांकरीता अल्पोपहाराची व्यवस्था देखील केली आहे.
समस्त लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष विजय चोरडिया यांनी केले आहे.श्रीराम जन्मोत्सव समिती वणी द्वारा आयोजीत या उपक्रमाचा अर्थात नेत्रचिकीत्सा शिबीराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, व रक्तदान शिबीरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे देखील समस्त जनतेला करण्यात आले आहे.
खालील प्रमाणे नोंदणीसाठी संपर्क क्रमांक दिलेले आहेत:- 9921124903,9096358002,9923334145,9923455040 या समस्त समस्त कार्यक्रमाचे आयोजक श्री राम जन्मोत्सव समिती, वणी -अध्यक्ष विजयबाबू चोरडीया व श्री राम जन्मोत्सव समिती,पदाधिकारी व सदस्य गण आहे.




